जळगाव: मुसळधार पावसाचा रेकॉर्ड! १५ पैकी १४ तालुक्यांत २०१५ नंतरची सर्वाधिक एकाच दिवसाची नोंद, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जळगाव: पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, गेल्या काही तासांत झालेल्या अतीमुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार मुक्काम ठोकला आहे.
मिळालेल्या सविस्तर आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण १५ पैकी चाळीसगाव तालुका वगळता उर्वरित सर्वच्या सर्व १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे!
२०१५ नंतर प्रथमच एकाच दिवसात एवढा प्रचंड पाऊस जिल्ह्यात कोसळला असून, या अभूतपूर्व पावसामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या धुवांधार आणि सततच्या पावसामुळे अवघ्या एकाच दिवसात जिल्ह्याची पावसाची तब्बल २५ टक्क्यांची तूट भरून निघाली आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी आता थेट १०६ टक्क्यांवर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदी-नाल्यांना जोरदार पूर आला असून अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत असली, तरी एकूण सरासरीसाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे.
प्रशासकीय यंत्रणेने सर्व यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, नदीकाठच्या लोकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *