सातारा: जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण आणि खटाव परिसरात दुष्काळाच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या असून, पर्जन्यमानाच्या अपुरेपणामुळे संपूर्ण जनजीवन आणि शेती व्यवसाय विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यात नदी-नालसे आणि विहिरींनी तळ गाठल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः करपून गेली असून, शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिवाळ्याच्या तोंडावरच हिरावला गेला आहे.
धोम-बलकवडी कालव्याचे आवर्तन दीड महिना उशिरा सुटल्यामुळे आदर्की मंडळातील हातची पिके पूर्णपणे गेली आहेत. तसेच पळशी परिसरात तब्बल ४,२५९ हेक्टरवरील पिके करपून नष्ट झाली आहेत. अनेक भागांत विहिरी कोरड्याठाक पडल्या असून मार्च महिन्यापासूनच कूपनलिका (ट्यूबवेल) बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. अनेक गावांमध्ये तळी, ओढे-नाळे पूर्णपणे कोरडेठाक झाले आहेत. औंध परिसरामध्ये सोयाबीनला शेंगा लागल्या असल्या तरी पाण्याचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे त्यामध्ये दाणेच भरले नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. पेरणीपासून ते खते, औषधे आणि मजुरीवर केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटले गेले आहेत. पुढील हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, असा मोठा प्रश्न बळीराजेसमोर उभा ठाकला आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ट्रिगर-१ अंतर्गत जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करून दुष्काळ जाहीर केला आहे. या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून प्रांताधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी व नुकसान भरपाईचा आढावा घेत आहेत. सध्या शेतकरी मका व बाजरी कापून जनावरांच्या चाऱ्याची कशीबशी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनाकडून तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची आक्रमक मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. केवळ कागदोपत्री पंचनामे न करता वस्तुनिष्ठ नोंद व्हावी आणि एकही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत.
दुष्काळाच्या या भीषण छायेत जिल्ह्याच्या पूर्व भागातील तब्बल ५२ गावांमध्ये ऐन पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे आगामी काळात टंचाईची स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




