गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!

गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात मनोमीलन व्हावे म्हणून पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून जोरात प्रयत्न सुरू आहेत. चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोनापावला येथे मंत्री विश्वजीत राणे यांच्या घरी भेट दिली व दुपारी एकत्र जेवणही केले. त्यानंतर काल आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मंत्री राणे यांनी भेट दिली. तिथे भाजपचे केंद्रीय नेते शिवप्रकाश व मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत राणे यांचे जेवण झाले.

विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना मुख्यमंत्री सावंत व मंत्री राणे यांच्यात अधिकाधिक चांगले संबंध असायला हवेत याची काळजी सध्या पक्षाचे केंद्रीय नेते घेत आहेत. उत्तर गोव्यात मंत्री राणे यांच्या कामाचा पक्षाला अधिक उपयोग व्हायला हवा म्हणून मंत्री राणे यांना भाजपच्या सर्व महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत आता सामावून घेतले जात आहे. भाजपने निवडणुकीसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री राणे यांना स्थान दिले गेले आहे. महिला व बाल कल्याण खात्याचा 'आंगन की सेवा' हा कार्यक्रम राज्यभर करण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राणे यांना मंजुरी दिली आहे.

दरम्यान, दुपारच्या जेवणावेळी कालही मुख्यमंत्री सावंत व मंत्री राणे यांच्यात चर्चा झाली. कोणती चर्चा झाली असे मीडियाने मंत्री राणे यांना विचारले असता, भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे एवढाच हेतू असल्याचे राणे म्हणाले. दुपारच्या जेवणावेळी शिवप्रकाश हेही उपस्थित होते. मंगळवारी मंत्री राणे व गोवा भाजप सहप्रभारी शिवप्रकाश यांनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट देऊन एकत्र जेवण घेतले. यावेळी राजकीय चर्चाही रंगली.

महत्त्वाचे राजकीय तपशील

  • पक्षाची एकजूट आणि समन्वय: आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अंतर्गत समन्वय आणि नेत्यांमधील सुसंवाद अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील भेटीगाठी व एकत्रित जेवणाच्या माध्यमातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे.

  • निवडणूक समिती आणि निर्णय प्रक्रिया: निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे यांनाही समाविष्ट करण्यात आले असून उत्तर गोव्यातील संघटनात्मक व विकासात्मक कामांचा लाभ पक्षाला व्हावा, असा दृष्टिकोन ठेवला जात आहे.

  • 'आंगन की सेवा' उपक्रम: महिला व बाल कल्याण खात्याशी संबंधित 'आंगन की सेवा' हा कार्यक्रम संपूर्ण गोवा राज्यात राबवण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मंजुरी दिली आहे.

  • मुख्य उद्दिष्ट: एकत्रित जेवण व राजकीय चर्चेदरम्यान कोणताही मतभेद नसून भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर आणणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *