नाशिक: शहरातील पंचवटी परिसरात १८ वर्षीय तरुणावर दगड तसेच धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर २०२६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास टकले नगर येथील जिजामाता व्यायाम शाळेच्या दरवाजाजवळ हा थरारक प्रकार घडला. वेदांत संतोष काळे (वय १८, रा. जुने नाशिक, खैरे गल्ली) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेत मित्रांनीच मित्राचा काटा काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ८ ते १० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी वेदांतला दगड आणि धारदार वस्तूंनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीररीत्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वेदांतवर हल्ला करणारा मुख्य संशयित पीयूष लोखंडे व त्याचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीयूष आणि वेदांत हे दोघे पंचवटीतील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. अवघ्या चार दिवसांपूर्वीदेखील त्यांच्यामध्ये वाद झाला होता; मात्र या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मृत वेदांतचे वडील महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असून त्यांना दोन मुली आणि वेदांत हा एकुलता एक मुलगा होता. घरातील एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने काळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेच्या काही मिनिटे अगोदर वेदांतला मित्रांचा घराबाहेर येण्यासाठी फोन आला होता. त्या वेळी त्याच्या आईने त्याला बाहेर जाऊ नको म्हणून बजावले होते तसेच त्याला दुचाकीही दिली नव्हती. तरीही वेदांत आपल्या चुलत भावासह दुचाकीवरून घराबाहेर पडला. तो जिजामाता व्यायाम शाळेच्या पायऱ्यांवर बसलेला असताना तीन दुचाकींवरून आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने त्याच्याशी वाद घालत अचानक जीवघेणा हल्ला चढवला.
नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्येची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी गुरुवारी म्हसरूळ भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर जुन्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान तरुणाच्या हत्येत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- छत्रपती संभाजीनगर: ड्युटी संपवून घरी निघालेल्या सुपरवायझरवर काळाचा घाला! वाळूज एमआयडीसीत कंपनीच्याच बसच्या धडकेत मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी
- पुणे: अतिक्रमणांविरोधात रान उठवणाऱ्या नगरसेवकाच्याच वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स! डेक्कनपासून कर्वे रस्त्यापर्यंत बॅनरबाजी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
गुन्हा
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!


























Subscribe to my channel




