
Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः वीकेंडला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही महिन्यांपूर्वी टँकर उलटल्याने तब्बल 32 तासांची कोंडी झाल्याची घटना अजूनही ताजी आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रशासनाने आता निर्णय घेतला असून येत्या पावसाळ्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहा पदरीकरणाचे काम सुरू होणार आहे.
टोल वसुलीचा कालावधी वाढणार
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून 94.6 किमी लांबीच्या या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2026 मध्ये सुरू होऊन 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी टोल वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या 2045 पर्यंत असलेली मुदत 2060 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद नसल्याने MSRDC ला स्वतंत्रपणे निधी उभा करावा लागणार आहे.
MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी सांगितले की, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम टप्प्याटप्प्याने केले जाईल.
‘मिसिंग लिंक’मुळे नवा पर्याय
या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 14,260 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या या महामार्गावर दररोज सुमारे 65,000 वाहने धावतात, तर वीकेंडला ही संख्या एक लाखाच्या पुढे जाते. दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी वाहतूक वाढत आहे.
येत्या मे महिन्यात 13 किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू होणार आहे. हा 10 पदरी मार्ग खंडाळा घाटातून जाणार असून प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार आहे. मात्र, वाढत्या वाहनसंख्येमुळे मुख्य महामार्गाचे रुंदीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2002 पासून सेवेत असलेला महामार्ग
नवी मुंबईतील कळंबोलीपासून सुरू होणारा हा महामार्ग पुण्यातील किवळेपर्यंत जातो. 2002 साली हा द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




