गोवा: 'लगे रहो मुन्नाभाई', 'फॅशन', 'देशी बॉईज' यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेता अश्विन मुशरन (Ashwin Mushran) हे एका गंभीर रस्ते अपघातामुळे आणि त्यानंतर झालेलेल्या वादानुसार मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गोव्यातील मडगाव परिसराजवळील कुसमान, केपे भागात हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
कसा घडला अपघात? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अभिनेता अश्विन मुशरन हे गोव्यात गाडी चालवत असताना, त्यांची कार चुकीच्या दिशेने (Wrong Side) जात होती. याच दरम्यान त्यांच्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून एक वडील आणि त्यांचे सुपुत्र प्रवास करत होते. या भीषण धडकेमध्ये दुचाकीस्वार वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्थानिकांसोबत वाद आणि गंभीर आरोप: अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. परंतु, जखमींना तातडीने मदत करण्याऐवजी अभिनेता अश्विन मुशरन आणि त्यांची पत्नी यांनी उलट दुचाकीस्वारालाच या अपघातासाठी दोष देण्यास सुरुवात केली, असा दावा स्थानिकांनी केला आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांसोबत त्यांची बाचाबाची आणि शाब्दिक चकमक उडाली. या संपूर्ण वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये अभिनेता आणि त्यांची पत्नी उपस्थित लोकांसोबत हुज्जत घालताना स्पष्ट दिसत आहेत.
या प्रकरणी स्थानिक नेते अमोल कनेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेत्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, जखमी व्यक्तीच्या शरीराचा हाडाचा एक तुकडा अभिनेत्याच्या कारच्या उजव्या बाजूच्या टायरच्या फेंडरमध्ये अडकला होता. तसेच, मदतीची भूमिका घेण्याऐवजी अभिनेता व त्यांची पत्नी तिथून एका पार्टीला जाण्यासाठी निघून जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला. संतप्त गावकऱ्यांनी त्यांची कार अडवून धरली आणि जोपर्यंत ते परत येऊन माफी मागितली जात नाही, तोपर्यंत गाडी सोडण्यास नकार दिला. या वादानंतर काही वेळाने अभिनेत्याने घटनास्थळी परत येत दिलगिरी व्यक्त केली, परंतु त्यांच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अद्याप अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




