छत्रपती संभाजीनगर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन संविधानाच्या माध्यमातून देशात सामाजिक आणि लोकशाही क्रांती घडविली. मात्र, आज संविधानावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यास आपण सर्वांनी सज्ज व्हावे. मराठवाड्यात घेतली जाणारी ही शपथ देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असा निर्धार आणि विश्वास काँग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केला. मराठवाडा शिवप्रेमी वकील मित्र संयोजन समितीच्या वतीने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर संभाजी भगत उपस्थित होते.
संविधानाची प्रस्तावना, नागरिकत्व आणि सरकारवर टीका
कार्यक्रमात बोलताना कन्हैयाकुमार यांनी देशातील नागरिकत्वाचा मुद्दा, लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, १४० कोटी जनता ही केवळ आकडेवारी किंवा संख्या नसून या देशाचे हक्कदार नागरिक आहेत. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला एक समृद्ध संस्कृती आणि इतिहास आहे. मात्र, 'एसआयआर'च्या नावाखाली घुसखोर ठरवून कोट्यवधी लोकांची नावे मतदारयादीतून वगळली आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारला प्रश्न विचारले, तर थेट तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
कन्हैयाकुमार पुढे म्हणाले की, हा देश जेवढा हिंदूंचा आहे, तेवढाच मुसलमानांचाही आहे; जेवढा ब्राह्मणांचा आहे, तेवढाच दलितांचाही आहे; आणि जेवढा श्रीमंतांचा आहे, तेवढाच गरीबांचाही आहे. या देशात प्रत्येकाला नागरिक होण्याचा समान अधिकार आणि नागरिक असल्याची हमी भारतीय संविधानाची प्रस्तावना देते. हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा आणि इतिहासाचे संरक्षण करण्याची शपथ आपण संविधानाच्या प्रस्तावनेतून घेऊया, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आपल्या भाषणाच्या शेवटी कन्हैयाकुमार यांनी हातात डफ घेऊन 'जयभीम' हे गीत सादर केले, ज्याला सभागृहातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाहीर संभाजी भगत यांचे सादरीकरण व मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शाहीर संभाजी भगत यांनी ऐतिहासिक व सामाजिक संदर्भांवर भाष्य केले. तथागत गौतम बुद्ध हे क्षत्रिय कुळातील होते आणि मराठे हे देखील क्षत्रिय मानले जातात; मात्र आज किती मराठ्यांच्या घरात बुद्धांची प्रतिमा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी आपल्या खास शाहिरी शैलीत 'भाळावरी काळोखाच्या भीम उजेड पेरितो' हे दमदार गीत सादर करून सभागृहात चैतन्य निर्माण केले.
या कार्यक्रमाच्या मंचावर खासदार कल्याण काळे, पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटील, अतुल लोंढे, नौशाद उस्मान, त्रिशूल पाटील, रविराज साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कीर्तनकार अश्विनी तावरे आणि आशिष मगर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक ॲड. दत्ता हूडपाटील यांनी केले.
शहर
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- मुंबई: ७ कोटी फ्लॅटधारकांसाठी मोठा निर्णय! आता प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' महसूल विभागाचा मसुदा जाहीर
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- मुंबई: २१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार ठरतील; डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात, जनतेची सत्ता हिरावण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: जात वैधता प्रमाणपत्र आता पूर्णपणे ऑनलाइन! राज्य सरकारचा मोठा निर्णय; वाचा संपूर्ण प्रक्रिया, नियम आणि शुल्क
- मुंबई: ७ कोटी फ्लॅटधारकांसाठी मोठा निर्णय! आता प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' महसूल विभागाचा मसुदा जाहीर
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




