पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!

पुणे: शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या मंदार किवळेवरील प्राणघातक हल्ला प्रकरणात तपासातून धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी करण्यात आली होती आणि हल्ल्याचा संपूर्ण कट अक्षय चव्हाणच्या घरी रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

नेमका कट कसा रचला गेला? मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील संतोषनगर येथे २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील आरोपी मंदार मारुती किवळे हा २१ नोव्हेंबर २०२६ रोजीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. तो शिवाजीनगर न्यायालयातील सुनावणीसाठी आणि कामकाजासाठी येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हल्ल्याचा कट आखण्यात आला. हल्ल्याच्या आदल्या दिवशी बैठक झाली आणि अक्षय चव्हाण याच्या घरी या हल्ल्याचा सविस्तर प्लॅन रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

 

 

 

५० हजारांची सुपारी आणि शस्त्रखरेदी भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संबंधित कुटुंबीयांच्या नातलगांनी किंवा ओळखीच्यांनी ५० हजार रुपयांची सुपारी ठरवली आणि त्यातील काही रक्कम आगाऊ देण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. याच सुपारीच्या रकमेतून मध्य प्रदेशातून देशी पिस्तूल आणि शस्त्रे खरेदी करण्यात आली. तसेच हल्लेखोरांनी कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांचीही तयारी केली होती.

न्यायालयाबाहेर भरदिवसा हल्ला बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) दुपारी सव्वा एकच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ परिसरात मंदार किवळे याला लक्ष्य करण्यात आले. सुरुवातीला हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पिस्तुलातून 'मिस फायर' झाल्याने गोळी लागली नाही. त्यानंतर हल्लेखोरांनी जवळ असलेल्या कोयत्याने मंदार किवळेवर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

पोलिसांची कारवाई व पुढील तपास या प्रकरणी पुणे पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील बहुतांश आरोपींना ताब्यात / अटक करण्यात आले आहे. दौंड तालुका, डेक्कन परिसर आणि इतर ठिकाणांहून पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, सुपारीची उर्वरित रक्कम कोणाकडून आली आणि शस्त्रे कोठून व कोणाच्या माध्यमातून आणली गेली, याचा सखोल तपास पुणे पोलीस व गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *