पुणे: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर बुधवारी दुपारी मंदार किवळेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासात अनेक धक्कादायक आणि नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामुळे आता पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाजू उघड झाली आहे. कात्रज आणि आंबेगाव परिसरातून आलेल्या सहा हल्लेखोरांच्या एका मोपेडला आरटीओची कोणतीही नंबरप्लेटच नव्हती. विशेष म्हणजे, अनेक प्रमुख चौक, सिग्नल आणि वाहतुकीची मोठी वर्दळ पार करत हे हल्लेखोर थेट शिवाजीनगर न्यायालयापर्यंत पोहोचले, तरीही संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलिसांनी त्यांना कोठेही अडवले नाही.
वाहतूक पोलिसांच्या तपासणीवर मोठे प्रश्नचिन्ह
कात्रज आणि आंबेगाव परिसरातून दोन मोपेडवरून सहा जण न्यायालय परिसरात आले होते, ज्यातील एका वाहनाला क्रमांकाची पाटी नव्हती. शिवाय एकाच गाडीवर तिघे जण प्रवास करत असतानाही कात्रज ते शिवाजीनगर या अत्यंत गजबजलेल्या मार्गावर कोणत्याही चौकात त्यांना हटकण्यात आले नाही. शहरात विनानंबरप्लेट वाहनांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असून त्यासाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, नंबरप्लेट नसलेले वाहन शहराच्या एका टोकापासून थेट मध्यवर्ती भागातील न्यायालयापर्यंत सहज पोहोचत असेल, तर रस्त्यावर तैनात पोलिसांचे अशा वाहनांकडे लक्ष जात नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहिमा राबवल्या जातात. मात्र, विनाक्रमांकाच्या वाहनातून आणि नियमांचे उल्लंघन करत हल्लेखोर थेट घटनास्थळापर्यंत प्रवास करतात आणि पोलिसांच्या नजरेतून सुटतात, तर या तपासणी मोहिमांचा नेमका उपयोग काय, याचे उत्तर मिळणे आवश्यक बनले आहे. या संपूर्ण घटनेमुळे शहरातील वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.
'फेस रिकग्निशन'च्या मदतीने आरोपींचा माग
हल्ल्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एआय (AI) आधारित सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत निर्णायक ठरली. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यादरम्यान हल्लेखोर न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या इंटिग्रेटेड कमांड सेंटरमधील 'फेस रिकग्निशन' प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत आरोपी दौंडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने विविध पथके रवाना करून आरोपींचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले.
तपासातील इतर महत्त्वाचे मुद्दे
मंदार किवळेवर शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ झालेल्या या हल्ल्यानंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्ल्यामागील नेमका कट, सूत्रधार, आर्थिक रसद आणि वापरण्यात आलेली शस्त्रे याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यात वेग दाखवला असला, तरी दुसरीकडे नंबरप्लेट नसलेल्या वाहनांचा शहरातून बिनधास्त वावर रोखण्यात वाहतूक यंत्रणा कमी पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
शहर
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




