सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!

सातारा: शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून मोठ्या संधी निर्माण करणारे क्षेत्र म्हणून पाहण्याची आज गरज आहे. युवा पिढीने कृषी क्षेत्रातील स्टार्टअप, अन्नप्रक्रिया उद्योग, आधुनिक पशुपालन आणि कृषी निर्यात या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. कराड येथे बुधवारी आयोजित २१ व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले यांनी केला, तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचा सत्कार उपसभापती नितीन ढापरे यांनी केला.

या उद्घाटन सोहळ्याला खासदार नितीन जाधव-पाटील, आमदार मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, आदिराज पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार-फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रीतिसंगम स्मृतिस्थळ दर्शन आणि भावना

कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, कराडच्या या ऐतिहासिक भूमीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित राहताना मनापासून आनंद होत आहे. येथे येण्यापूर्वी प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्याने पुढे काम करण्याची एक नवी ऊर्जा मिळाली आहे.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती नंदा यादव, उपसभापती अनिता वेताळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, राजेश पाटील-वाठारकर, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष कृष्णत पाटील, कोयना दूध संघाचे अध्यक्ष बाबूराव धोकटे आणि उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनातील लाइव्ह मॉडेल्सची पाहणी

कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विविध मान्यवरांसमवेत कृषी विभागाच्या विविध स्टॉलवरील लाइव्ह मॉडेल्सची सविस्तर पाहणी केली. आधुनिक शेती, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी या भेटीदरम्यान घेतली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *