पुणे: पुण्यातील शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाजवळ बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) सहा जणांच्या टोळक्याने जुन्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या ३५ वर्षीय मंदार किवळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत हा हल्ला चढवण्यात आला. न्यायालय परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ आणि खळबळ उडाली होती. दरम्यान, आज (२६ नोव्हेंबर) अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, कोर्टाने सर्व आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्यांना दोन डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचला कट
कात्रज परिसरातील संतोषनगरमध्ये गेल्या वर्षी २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा. कात्रज) याचा खून झाला होता. त्या खुनाचा बदला घेण्यासाठीच मंदार किवळे याच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणात शुभम चव्हाण याचा भाऊ अक्षय सुभाष चव्हाण (वय २०) हा या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या गुन्ह्याप्रकरणी अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८), स्वप्नील बाजीराव गवळी (वय २८), ओंकार संतोष पवार (वय १९), सूरज साधू मळेकर (वय २२) आणि अक्षय चव्हाण यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कोर्टात वकील काय म्हणाले?
दरम्यान, न्यायालयात बाजू मांडताना ॲड. शुभांगी परुळेकर म्हणाल्या की, आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत. मंदार किवळे हा केवळ नशिबाने जिवंत राहिला आहे; त्याला मी मदत केली असून त्याला न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तो सध्या रुग्णालयात आपल्या जीवनासाठी झगडत आहे. हा संपूर्ण कट नेमका कसा रचला गेला याची सखोल चौकशी पोलिसांना करावी लागणार असल्याने जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टासमोर केली.
कट रचण्यामागे मास्टरमाईंड कोण? पोलिसांचा धक्कादायक खुलासा
सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाकडे दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपींनी पिस्तूल नेमके कोठून आणले, या गुन्ह्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली आणि हा संपूर्ण कट रचण्यामागे खरा मास्टरमाईंड कोण आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हा जीवघेणा हल्ला केला असून सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.
कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं होतं?
बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर मंदार किवळे याच्यावर हल्ला झाला. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र 'मिस फायर' झाल्याने गोळी लागली नाही. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. कोयत्याचा वार डोक्यात बसू नये म्हणून मंदारने आपले दोन्ही हात डोक्याला लावले; मात्र या भयंकर वारात त्याच्या हाताचा पंजाच मनगटापासून वेगळा होऊन लोंबकळायला लागला. गंभीर जखमी झालेल्या मंदार किवळेला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती; त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
शहर
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
महाराष्ट्र
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
गुन्हा
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




