पुणे: राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (सीसीव्हीआयएस - CCVIS) ही प्रणाली विकसित करण्यात आली असून, या प्रणालीद्वारे अर्ज आणि कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्यापासून ते ऑनलाइन सुनावणी आणि प्रमाणपत्र ईमेल व व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय व परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस - TCS) यांच्या सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (सीसीव्हीआयएस) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे आणि अर्जदारांच्या माहितीची होणारी पुनरावृत्ती कमी करणे शक्य होणार आहे. तसेच आवश्यक सुनावणीची प्रक्रिया दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एआय (AI) चॅटबॉटद्वारे अर्जदारांना मार्गदर्शन करणे आणि जात वैधता प्रमाणपत्र ईमेल तसेच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याच्या सुविधांचा या प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या थांबणार
या नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे कार्यालयीन प्रक्रियेवरील अवलंबित्त्व मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून अर्जासोबतची सर्व कागदपत्रे आणि शपथपत्रे केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच सादर करता येतील; अन्य कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (हार्ड कॉपी) कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. पडताळणी प्रक्रियेमध्ये लिपिकाकडून तांत्रिक तपासणी झाल्यानंतर सदस्य सचिव, अध्यक्ष आणि समिती सदस्य पुराव्यांची गुणवत्तेवर पडताळणी करतील. तसेच आवश्यकतेनुसार आस्थापना किंवा दक्षता पथकाकडून चौकशी केली जाईल.
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सगळं काही ऑनलाइन
नमुना २५ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवणे, अतिरिक्त पुराव्यांची मागणी करणे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेणे अशी कार्यवाही करण्यात येईल. अर्जदाराला वाजवी संधी आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणी दिल्याशिवाय कोणताही दावा अवैध ठरवता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित समिती शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेईल. अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी पुढील दोन महिने ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्जदाराला कळवले जाईल. पाचव्या महिन्यात अंतिम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीची संधी दिली जाईल आणि त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास प्रकरण निकाली काढले जाईल. वैध किंवा अवैध ठरवलेल्या प्रकरणात अपिलीय प्राधिकरणाच्या किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार महासंचालकांच्या पूर्वमान्यतेने अर्ज पुन्हा सुरू करता येईल, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
नेमके शुल्क किती आकारले जाणार?
-
शैक्षणिक प्रयोजनासाठी: जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल.
-
निवडणूक आणि अन्य प्रयोजनासाठी: ५०० ते १००० रुपये शुल्क आकारले जाईल. (ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सेवाविषयक प्रयोजन आणि इतर शासकीय योजना व प्रयोजनांसाठी १ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाण्याची तरतूद आहे.)
शहर
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- मुंबई: २१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार ठरतील; डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात, जनतेची सत्ता हिरावण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
महाराष्ट्र
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- मुंबई: २१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार ठरतील; डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात, जनतेची सत्ता हिरावण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
गुन्हा
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




