नागपूरच्या उद्योगासाठी मोठी खूशखबर! बुटीबोरीतील 'इंडो रामा' प्रकल्पात २०० कोटींची गुंतवणूक; संचालक मंडळाची मंजुरी, काय होणार उत्पादन?

नागपूर जवळील प्रमुख औद्यागिक क्षेत्र असलेल्या बुटीबोरी (Butibori) येथील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. देशातील अग्रेसर सिंथेटिक फिलामेंट आणि यार्न उत्पादक कंपनी असलेल्या 'इंडो रामा सिन्थेटिक्स (इंडिया) लिमिटेड' (Indo Rama Synthetics) च्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत बुटीबोरी येथील प्रकल्पासाठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणूक विस्ताराला (Capex Expansion Plan) अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीमुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार असून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

विशेष फिलामेंट्स आणि फायबर उत्पादनावर भर:

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा २०० कोटी रुपयांचा विस्तार प्रकल्प प्रामुख्याने स्पेशालिटी फिलामेंट (Speciality Filament) आणि स्पेशालिटी फायबर (Speciality Fibre) च्या उत्पादनासाठी असणार आहे. औद्योगिक आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात विविध उपयोगांसाठी उच्च दर्जाच्या व्हॅल्यू-एडेड (Value-Added) उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. याच मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि बाजारातील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी इंडो रामा कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या नवीन उत्पादनांमुळे कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येणार असून उच्च मूल्य असलेल्या उत्पादनांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

प्रकल्प अंमलबजावणी आणि नियोजित मुदत:

हा सर्व प्रकल्प इंडो रामा सिन्थेटिक्स आणि तिची पूर्ण मालकी असलेली सहाय्यक कंपनी 'इंडो रामा व्हेंचर्स यार्न्स प्रायव्हेट लिमिटेड' (Indo Rama Ventures Yarns Private Limited - IVYPL) यांच्या संयुक्त सहकार्याने कार्यान्वित केला जाणार आहे. प्रकल्पाच्या वित्तपोषणासाठी (Funding) कंपनीने बँकेचे मुदत कर्ज आणि अंतर्गत महसूल (Internal Accrual) यांचा समतोल साधत नियोजन केले आहे.

संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, आगामी १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत या प्रकल्पाचे व्यावसायिक उत्पादन (Commercial Production) सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरच्या बुटीबोरी प्लांटमधील या नव्या गुंतवणुकीमुळे विदर्भातील वस्त्रोद्योग क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून औद्योगिक वर्तुळात याचे स्वागत होत आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *