
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोडच्या उभारणीकरिता जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या जमिनींची आवश्यकता असून, या जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला बुधवार (दि. २८) पासून सुरुवात करण्यात आली. भूसंपादन कायद्यान्वये सक्तीचे भूसंपादन वेळखाऊ प्रक्रिया असून, प्रशासन २५ टक्के अधिक मोबदल्यासह थेट खरेदीने जमिनी घेण्यास प्रयत्नशील आहे. बुधवारी देवळालीसह काही गावांमध्ये शेतकऱ्यांकडून मोजणीला विरोध झाला. त्यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत समजूत काढण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार आणि जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. भूसंपादन आणि रिंगरोडची बांधणी याकरिता सरकारने सुमारे सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बाह्य रिंगरोड ६६ किलोमीटरचा असणार आहे. शहरालगतच्या काही गावांसह नाशिक, दिंडोरी, आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधील सुमारे १८ गावांमधून हा रस्ता जाणार आहे. शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी करणे आणि कनेक्टीव्हिटी वाढविणे हा या रस्ता बांधणीचा उद्देश आहे.
|
|
कोणत्या गावांमधून मार्ग?
याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु, या प्रकल्पासाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी देण्यास काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून हा रिंगरोड नाशिकच्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे यासह कोणत्या निकषानुसार मोबदला मिळणार याची माहिती देत आहेत. तरीही काही गावांमध्ये विरोध कायम असला तरी अनेक शेतकरी थेट खरेदीने जमिनी देण्यास तयार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. अशा शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणीला बुधवारी (दि. २८) सकाळी सुरुवात करण्यात आली. आडगाव, विहीतगाव, आंबेबहुला, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पंचक, वडनेर दुमाला, माडसांगवी, विल्होळी, मुंगसरा, देवळालीसह संबंधित गावांमध्ये एकाचवेळी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मोजणीला विरोध
जमीन मोजणी सुरू झाली असली तरी त्यास शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी विरोध होतो आहे. शहरात सिटी सर्व्हे कार्यालयाच्या माध्यमातून तर नाशिक आणि दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांच्या स्तरावरून एकाचवेळी जमिन मोजणीला सुरुवात झाली आहे. देवळालीत बुधवारी जमीन मोजणीला विरोध झाला. परंतु, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भूसंपादन कायद्याने जमीन खरेदीला किमान शंभर ते सव्वाशे दिवसांचा कालावधी लागतो.
परंतु, प्रशासनाने थेट खरेदीने जमिनी घेण्यास प्राधान्य दिले असून, याकरिता शेतकऱ्यांची संमती लागते. थेट खरेदीने होईल तेवढे भूसंपादन करण्याचा आमचा प्रयत्न असून, याकरिता प्रत्येक गावासाठी भूमी अभिलेखने एक अधिकारी नियुक्त केला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक या अधिकाऱ्यांच्या मदतीला असल्याचे सांगण्यात आले. १० फेब्रुवारीपर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel





1 thought on “Nashik Ring Road : नाशिक रिंग रोडच्या कामांना गती; १० फेब्रुवारीपर्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण, १८ गावांना जोडणारा मार्ग कसा असेल?”