ऑस्ट्रेलियाचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील स्वप्न भंगलं, झिम्बाब्वेची सुपर 8 फेरीत धडकImage Credit source: Zimbabwe Cricket Twitter
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप ब मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. या गटात सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले आहेत. या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान हे संघ आहेत. त्यामुळे या गटातून स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांना पसंती दिली गेली होती. पण प्रत्यक्षात या गटात वेगळंच घडलं. कोणाच्या ध्यानीमनी नसेल असा निकाल या गटात लागला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आणि गटातील चित्र बदललं. त्यानंतर श्रीलंकेने ऑस्टेलियाला पराभूत केलं आणि कांगारूंचा पाय आणखी खोलात गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं गणित जर तर वर आलं होतं. झिम्बाब्वे उर्वरित दोन्ही सामन्यात पराभूत झाली तर ऑस्ट्रेलियासाठी थोड्याफार आशा होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या आशेवर पावसाचं पाणी पडलं. कारण झिम्बाब्वे आणि आयर्लंड सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शेवटचा सामना खेळण्यापूर्वीच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं होतं.
…म्हणून झिम्बाब्वेची सुपर 8 फेरीत धडक
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत झिम्बाब्वे आणि आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेला थेट सुपर 8 फेरीचं तिकीट मिळालं आहे. पाऊस थांबवण्याचं नाव घेत नसल्याने कटऑफ टाईम असलेल्या संध्याकाळी 6.10 पर्यंत होतं. पण तिथपर्यंत वाट पाहण्यात काहीच अर्थ नव्हता. पंचांनी दोन्ही कर्णधारांशी चर्चा केली. त्यानंतर हा सामना ड्रॉ झाल्याचं घोषित केलं. यासह झिम्बाब्वेच्या खात्यात 5 गुण जमा झाले आहे. त्यामुळे या गटातून श्रीलंकेनंतर झिम्बाब्वेने एन्ट्री मारली आहे. कारण शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तरी 4 गुण होतील. तर आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर 8 फेरीत जागा मिळवणारा झिम्बाब्वे हा सातवा संघ ठरला आहे.
पाकिस्तान की अमेरिका
अ गटातून भारताने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. आता पाकिस्तान आणि अमेरिका यापैकी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. पाकिस्तान आणि नामिबिया सामन्यावर हे अवलंबून आहे. या सामन्यात नामिबियाने विजय मिळवला तर अमेरिकेला संधी मिळेल. पण पाकिस्तानने हा सामना जिंकला किंवा पावसामुळे रद्द झाला. तर पाकिस्तानला संधी मिळेल. आता या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




