पुणे: जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत केवळ नऊ कामगारांचे जीव गेले नाहीत, तर नऊ कुटुंबांचा आधार, स्वप्ने आणि उद्याची आशाही हिरावली गेली आहे. कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे हे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणार्धात मोडला आहे. या घटनेने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिमुरड्या बाळाच्या डोक्यावरचे छत्र हरपले:
सुनील भारत कोरके (वय ३४) हे मूळचे करकंब (ता. पंढरपूर) येथील होते आणि गेल्या सहा वर्षांपासून या प्रकल्पात असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. इमारतीत काम करत असताना कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, अवघे २५ दिवसांचे बाळ, गावाकडे राहणारे आई-वडील आणि जुळा भाऊ असा मोठा परिवार आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला होता, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, काळाच्या क्रूर घाताने काही दिवसांतच त्या चिमुरड्याच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले.
दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला:
सनी अशोक माने (वय ३६) यांचाही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. मोशीतील शास्त्रीनगर येथे राहणारे सनी तीन वर्षांपासून 'वेस्ट-टू-एनर्जी' प्रकल्पात वाहन चालक होते. घटनेच्या दिवशी घरी बिर्याणीचा बेत होता, मात्र सहकाऱ्यासोबत जेवण्यासाठी ते कार्यालयात थांबले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी कांचन, सात वर्षांचा ईशान आणि दोन वर्षांचा विहान अशी मुले आहेत. कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सनी यांच्या निधनाने कुटुंबावर उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
लेकींच्या भविष्यासाठी झटणारा हात थांबला:
नागेश सर्जेराव गायकवाड (वय २९) हे तीन वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. दुर्घटनेच्या वेळी प्रशासकीय इमारतीत असताना कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी सोनाली, चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. स्वतःचे घर उभे करणे आणि मुलींना उच्चशिक्षित करणे हे त्यांचे ध्येय होते, परंतु या दुर्घटनेने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




