नवी दिल्ली : ट्रेनच्या आरक्षित (Reserved) डब्यातून प्रवाशाचे सामान किंवा बॅग चोरीला गेल्यास आता भारतीय रेल्वे (Indian Railways) आपली जबाबदारी झटकू शकणार नाही. दिल्ली राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने (Delhi State Consumer Commission) एका अत्यंत महत्त्वपूर्ण निकालात उत्तर रेल्वेच्या विरोधात दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. आरक्षित डब्यात अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशास आळा घालण्यात आणि प्रवाशाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात रेल्वे प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे दिसून आल्याचे सांगत, आयोगाने रेल्वेला संबंधित प्रवाशाला १ लाख ४५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी: अजय कुमार असे या प्रकणातील पीडित प्रवाशाचे नाव असून, ७ जून २०१४ रोजी ते महानंदा एक्सप्रेसमधून (Mahananda Express) दिल्ली ते पटना असा प्रवास करत होते. त्यांनी आरक्षित श्रेणीतील (Reserved Coach) तिकिटावर प्रवास केला होता. जुनी दिल्ली रेल्वे स्थानकावर (Old Delhi Railway Station) ट्रेन थांबलेली असताना, काही अनधिकृत व्यक्तींनी थेट आरक्षित डब्यात प्रवेश केला आणि अजय कुमार यांची साड्या, दागिने व कपड्यांनी भरलेली सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची ट्रॉली बॅग घेऊन पोबारा केला.
रेल्वेचा दावा आणि आयोगाचे ताशेरे: चोरीची घटना घडल्यानंतर प्रवाशाने तात्काळ कोच अटेंडंट आणि रेल्वे सुरक्षा दलाशी (RPF) संपर्क साधला होता. परंतु, वेळेवर योग्य मदत मिळाली नाही आणि एफआयआर (FIR) नोंदवण्यासही टाळाटाळ करण्यात आली. यानंतर प्रवाशाने ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
-
रेल्वेची बाजू: उत्तर रेल्वे प्रशासनाने युक्तिवाद केला होता की, प्रवाशाचे सामान त्याच्या स्वतःच्या ताव्यात आणि सुरक्षिततेत होते, ते रेल्वेकडे अधिकृतपणे बुक केलेले नव्हते. त्यामुळे चोरीची जबाबदारी रेल्वेवर येऊ शकत नाही.
-
आयोगाचा दणका: दिल्ली राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती संगीता ढिंगरा सहगल आणि सदस्य बिमला कुमारी यांच्या खंडपीठाने रेल्वेचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. "आरक्षित डब्यात विनातिकीट किंवा अनधिकृत लोकांना प्रवेश मिळण्यापासून रोखण्यात रेल्वे कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरले. या प्रशासकीय आणि सुरक्षेतील त्रुटीमुळेच (Deficiency in Service) ही चोरी घडून आली. त्यामुळे रेल्वे आपल्या कर्तव्यातून सुटका करून घेऊ शकत नाही," असे स्पष्ट निरीक्षण आयोगाने नोंदवले.
भरपाईची नेमकी रक्कम आणि अटी: या प्रकरणी जिल्हा ग्राहक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, उत्तर रेल्वेला खालीलप्रमाणे रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:
-
चोरीला गेलेल्या सामानापोटी १ लाख २० हजार रुपये, त्यावर ७ सप्टेंबर २०१७ पासून ९ टक्के वार्षिक व्याजासह.
-
प्रवाशाला झालेल्या मानसिक त्रास, मनस्ताप आणि हानीपोटी २५,००० रुपये नुकसानभरपाई.
-
हे आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम चुकती करणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत पैसे न दिल्यास संपूर्ण रकमेवर १२ टक्के वार्षिक व्याज आकारले जाईल, असा कडक इशाराही आयोगाने दिला आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




