
Pune : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील तिघांची सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर, पोलिस ठाण्यासह मार्केट यार्ड आणि वाघोली पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील तक्रारदार मूळचे मेघालय येथील असून, सध्या ते लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात राहतात. फसवणुकीचा प्रकार २३ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत घडला.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे शेअर खरेदीतून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानुसार तक्रारदारांनी संबंधित खात्यांमध्ये एकूण ५० लाख रुपये वर्ग केले. मात्र, कोणतीही शेअर खरेदी किंवा परतावा न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
४२.६६ लाखांना गंडा
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून बिबवेवाडी येथील व्यक्तीची ४२ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून लिंक पाठवली. सुरुवातीला अल्प रक्कम परत देऊन त्यांचा विश्वास संपादन केल्यावर विविध कारणे सांगून आरोपींनी मूळ गुंतवणूक व नफ्याची रक्कम परत न करता ४२ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार १६ नोव्हेंबर २०२५ ते चार फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला.
'यूपीआय'द्वारे लूट
शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी यूपीआय, 'आरटीजीएस'द्वारे पैसे घेऊन एका तरुणाची साडेसव्वीस लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी केसनंद येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदारांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून शेअर ट्रेडिंगबाबत सातत्याने मेसेज पाठवले जात होते. अधिक नफ्याचे आमिष दाखवून यूपीआय व आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी २६ लाख ५५ हजार रुपये पाठवले. मात्र, कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली.
तपास सुरू; नागरिकांना दक्षतेचे आवाहन
तिन्ही प्रकरणांत पोलिसांकडून बँक खाते, मोबाइल क्रमांक, डिजिटल लिंक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुप, संशयास्पद लिंक किंवा अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करताना नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Pune : शेअर ट्रेडिंगमध्ये सव्वा कोटींचा फटका; पुण्यात तिघांची मोठी फसवणूक, नेमकं काय घडलं?”