रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"

रत्नागिरी: चिपळूणमधील वालोपे परिसरात सांगलीतील एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या डोक्यात दगडाने वार करण्यात आले. त्यामुळे रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची हत्या कोणी केली आणि हत्येचे कारण, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. नवनाथ बबन कांबळे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सांगली जिल्ह्यात खडेगाव तालुक्यात असलेल्या वांगी गावाचा रहिवाशी आहे. तो बहिणीकडे राहत होता.

घरातून बाहेर पडला आणि मृतदेह मिळाला
नवनाथ कांबळे हा चिपळूणमध्ये त्याच्या बहिणीकडे राहत होता. सोमवारी (१६ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता तो घरातून बाहेर पडला होता. तो घरी परत आलाच नाही, असे त्याच्या घरच्यांनी सांगितले.चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी सांगितले की, 'पोलीस नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने कॉल करून याबद्दलची माहिती दिली. वालोप्यामध्ये रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.'

वालोप्यातील घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. एका दुकानाच्या मागच्या बाजूला नवनाथ कांबळे याचा मृतदेह पडलेला होता. लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीतील लोकांकडे त्याच्याबद्दल चौकशी केली. त्यातील एकाने त्याच्याबद्दल माहिती दिली.


बहिणीच्या पतीला बोलावून ओळख पटवली
त्या व्यक्तीने मयत नवनाथ कांबळे याच्या बहिणीच्या पतीला ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले. बहिणीच्या पतीने सांगितले की, नवनाथला दारू प्यायचे व्यसन होते आणि तो काल रात्री घरातून निघून गेला होता.

नवनाथची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. नवनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या डोक्याच्या बाजूला दगडाचा चिरा आढळून आला. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलावून पुरावे जप्त केले आहेत. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *