सोलापूर: आपल्याला सोडून गेलेली बायको परत मिळावी म्हणून दीपक सूर्यवंशी या व्यक्तीने सोमवारी गाढविणीसोबत प्रतीकात्मक विवाह केला. जिल्हा परिषद, पूनम गेटसमोर सोमवारी दुपारी हे अनोखं आंदोलन झालं. या प्रकरणी पोलिसांनी सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं. रात्री १०.३० पर्यंत पोलीस कारवाईबाबत निर्णय घेत होते.
सूर्यवंशी १५ दिवसांपासून पूनम गेटसमोर आंदोलनाला बसले आहेत. ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाला निवेदन दिले होते. आपला १६ वर्षाचा संसार तुटला. या प्रकरणात पत्नीच्या नात्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.
प्रशासनाकडून या प्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नसल्याने गाढविणीसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी एक गाढवीण आणली. मंगलाष्टके आणि गाढविणीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून त्यांनी हा प्रतीकात्मक विवाह केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी सूर्यवंशी यांना थेट पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत ते तिथेच थांबून होते.
लग्न ही महाराष्ट्रातील गंभीर समस्या झाली आहे. अनेक तरुणांचे विवाह जुळत नाहीत. मुलांबद्दल मुलीकडचे लोक अनेक अपेक्षा ठेवून असतात. त्यामुळे लग्नाळू तरुण व्यसनाधीन झाले आहेत. आता मला माझा संसार करायचा आहे. त्यामुळे मी प्रतीकात्मक आंदोलन केले. जिल्हा परिषदेसमोर गाढव फिरत असतात. तिथूनच या गाढवांना ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करावी.
न्यायासाठी १५ दिवसांचे धरणे आंदोलन आणि अनोखा विवाह
गेल्या १५ दिवसांपासून आपली पत्नी पूजा सूर्यवंशी ही पुन्हा आपल्यासोबत संसार करण्यासाठी परत यावी, यासाठी दीपक सूर्यवंशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते. प्रशासनाने आणि संबंधित व्यक्तींनी आपल्या समस्येची दखल घ्यावी, यासाठी त्यांनी हे उपोषण छेडले होते. मात्र, प्रशासनाकडून किंवा संबंधित मंडळींकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने अखेर वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी एक अत्यंत टोकाचे आणि लक्षवेधी पाऊल उचलले.
दीपक सूर्यवंशी यांनी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी चक्क एका गाढविणीशी रीतसर प्रतिकात्मक विवाह केला. या अनोख्या लग्नाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसराबाहेर करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात रीतसर मंगलाष्टक म्हणण्यात आल्या आणि दीपक यांनी गाढविणीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून अक्षता टाकल्या. या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचे छायाचित्र असलेले बॅनरही लावले होते, ज्यावर "माझा संसार मोडण्यासाठी प्रशासन जागे व्हा, माझा दोष काय?" असे भावनिक आणि सवाल करणारे मजकूर लिहिलेले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूर शहरात मोठी चर्चा सुरू असून, एका बाजूला या प्रकाराची खिल्ली उडवली जात आहे, तर दुसरीकडे कौटुंबिक वादाच्या या विचित्र मार्गावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




