
Pune : निवासी डॉक्टरांच्या संपाचा सर्वाधिक फटका ससून रुग्णालयातील रुग्णसेवेला बसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी ‘ससून’ प्रशासन प्रयत्न करीत आहे.
‘ससून’वर रुग्णसेवाचा ताण असतानाच निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी-चिचंवड महापालिका, पुणे महापालिका, राज्याचा आरोग्य विभागासह एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर उपलब्ध करून देण्याची विनंती ‘ससून’ प्रशासनाने केली आहे. याबाबत संबंधित विभागांच्या प्रमुख्यांना पत्र पाठविण्यात आले आहे; परंतु विनंतीचे पत्र पाठवून पाच दिवस झाले असतानाही संबंधित विभागांकडून कोणतेही उत्तर ससून प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे ससून प्रशासनाला उपलब्ध असलेले डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर काम करावे लागत आहे.
|
'या' फुलांमुळे प्रदूषण वाढत आहे! जाणून घ्या सविस्तर माहिती..... |
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय ससून रुग्णालयाशी संलग्न आहेत. ‘बीजे’मध्ये ५६६ निवासी डॉक्टर आहेत. याच निवासी डॉक्टरांमार्फत विविध विभागांतील रुग्णसेवा केली जाते. संपामुळे निवासी डॉक्टर केवळ अत्यावश्क सेवा देत आहेत. परिणामी आपत्कालीन विभाग वगळता अन्य सर्व विभागांवर संपाचा परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका बाह्यरुग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाला बसत आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
बुधवारची आकडेवारी
- ओपीडी : १३३७
- आयपीडी : ९५०
- गंभीर शस्त्रक्रिया : २६
- किरकोळ शस्त्रक्रिया : ४०
- प्रसूती : १४
- आयसीसू : १०१
बंगालमध्येही आरोग्यसेवा कोलमडली
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या झाल्याच्या घटनेनंतर सरकारी डॉक्टरांमध्ये निर्माण झालेला क्षोभ कमी होताना दिसत नाही. या घटनेच्या निषेधार्थ सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला असून त्यांचे आंदोलन बुधवारी, सलग तेराव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनामुळे पश्चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवा कोलमडली आहे. या आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसत आहे. ‘रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्याने रुग्णांना दाखल करून घेणे आम्ही टाळत आहोत,’ अशी माहिती कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने दिली.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




