पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या वाकड परिसरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चौधरी पार्क तसेच यमुनानगर रोड परिसरातील काही नागरिक, रस्त्यावरील फेरीवाले आणि दुकानदारांकडून रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने परिसराला अक्षरशः कचऱ्याचे हब स्वरूप प्राप्त होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर भटक्या कुत्र्यांकडून ताव मारला जात असल्याने कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरतो. यामुळे परिसरात अस्वच्छतेबरोबरच दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी आणि पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा टाकण्याची समस्या केवळ नागरिकांपुरती मर्यादित नसून काही फेरीवाले आणि दुकानदारांकडूनही व्यवसायानंतर निर्माण होणारा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ कचरा उचलण्यावर भर न देता कचरा कुणाकडून आणि कुठे टाकला जात आहे, यावरही लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका कर्मचारी उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार
परिसरात कचरा साचूनही अनेक वेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, कचरा काही काळ तसाच पडून राहतो आणि भटकी कुत्री तसेच इतर प्राणी तो परिसरभर पसरवतात.
नागरिकांच्या मते, नियमित कचरा संकलनाबरोबरच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली तरच या समस्येला आळा बसू शकतो. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरात विशेष पाहणी करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक, फेरीवाले आणि दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
‘नो पार्किंग’चे बोर्डच गायब; वाहतूक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, यमुनानगर रोड परिसरात स्वच्छतेसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या रस्त्यावर महापालिका अथवा संबंधित प्रशासनाने लावलेले अनेक ‘नो पार्किंग’चे फलक आजूबाजूला राहणाऱ्या काही नागरिकांनी काढून टाकल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
स्वतःच्या वाहनांना रस्त्यावर पार्किंग करता यावे, यासाठी नो पार्किंगचे फलक हटविले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. फलकच नसल्यामुळे रस्त्यावर बेकायदा पार्किंग होत असले तरी त्याविरोधात तक्रार करताना नागरिकांना अडचणी येत आहेत.
विशेष म्हणजे, नो पार्किंगचा अधिकृत फलक नसल्यामुळे PTP App वरही अशा पार्किंगविरोधात तक्रार नोंदविण्यात अडथळा येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने गायब झालेले किंवा काढून टाकलेले नो पार्किंग फलक तातडीने पुन्हा बसवावेत, तसेच ते जाणीवपूर्वक हटविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे कचरा, दुसरीकडे बेकायदा पार्किंग
चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिकांना एकाच वेळी स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, त्यावर फिरणारी भटकी कुत्री, निर्माण होणारी दुर्गंधी आणि त्याच परिसरात होणारी अनधिकृत पार्किंग यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
महापालिकेने या परिसराकडे केवळ तक्रार आल्यानंतर स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून न पाहता नियमित निरीक्षण, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वेळेवर कचरा संकलन आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती या सर्व उपाययोजना एकत्रितपणे राबविण्याची गरज आहे.
तसेच यमुनानगर रोडवरील नो पार्किंग व्यवस्था पुन्हा प्रभावी करण्यासाठी हटविलेले फलक तातडीने बसविणे, बेकायदा पार्किंगवर कारवाई करणे आणि PTP App वर तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
वाकडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या परिसराची ओळख केवळ मोठ्या इमारती आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नव्हे, तर स्वच्छ आणि शिस्तबद्ध परिसर म्हणूनही व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




