नंदुरबार: जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रवाशांच्या हिताची बातमी समोर येत आहे. नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) अंतर्गत काम करणाऱ्या भरारी व वायुवेग पथकाने (Speeding Squad) एका महत्त्वपूर्ण कारवाईत, प्रवाशांना योग्य सेवा न देता किंवा प्रवाशांची सर्रास पळवापळव व फसवणूक करणाऱ्या दोन खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या खासगी बसचालकांचे धाबे दाणान सुटले आहेत.
नेमकी कारवाई कशी झाली? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर आणि आसपासच्या परिसरात काही खासगी ट्रॅव्हल्स व बसेसधारकांकडून विनापरवाना तसेच ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आरटीओ विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही खासगी बसचालक अधिकच्या नफ्यासाठी प्रवाशांना योग्य ठिकाणी न सोडणे, विहित नियमांचे उल्लंघन करणे किंवा ऐन वेळी प्रवाशांना डावलून मनमानी कारभार करणे यांसारखे प्रकार करत होते.
या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहादा शहरात आणि महामार्ग परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली. या तपासणी दरम्यान नियमभंग करणाऱ्या आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खासगी बसेसची कसून तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दोन्ही बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicles Act) दंडात्मक कारवाई करत मोठा दंड आकारण्यात आला आहे.
प्रशासनाचे कडक इशारे: आरटीओ विभागाच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रवाशांची सुरक्षा, त्यांच्याकडून जास्त भाडे आकारणी रोखणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे यासाठी यापुढेही अशीच धडक मोहीम राज्यभरात आणि जिल्ह्यात सुरूच राहणार असल्याचा इशारा परिवहन विभातर्फे देण्यात आला आहे. या कारवाईचे सर्वसामान्य प्रवाशांकडून स्वागत होत असून, यामुळे खासगी बसचालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!




























Subscribe to my channel




