O Romeo Opening Collection: 2026 मध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, नुकताच असा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याची अॅडव्हान्स बुकिंग अपेक्षेइतकी दमदार नसतानाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे पाहता निर्माते आणि स्टारकास्टसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे.
विशेष म्हणजे मुंबईत या चित्रपटाचे डझनभर शो रद्द करण्यात आले होते, तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने समाधानकारक सुरुवात केली. ट्रेड रिपोर्ट्सनुसार वीकेंड आणि नाईट शोच्या कमाईनंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चित्रपटाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि अभिनेता शाहिद कपूर यांची पुन्हा एकदा जुळलेली जोडी. याआधी दोघांनी एकत्र काम केलेल्या हैदर आणि कमीने या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या नव्या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. दमदार स्टारकास्ट आणि वेगळी प्रेमकहाणी ही या चित्रपटाची चांगली बाजू ठरत आहे.
पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8.25 कोटी रुपयांची कमाई करत चांगली ओपनिंग केली. व्हॅलेंटाईन वीकचा फायदा या चित्रपटाला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण चित्रपटात एक वेगळी आणि भावनिक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. त्यासोबतच प्रेक्षकांना आकर्षित करणारे अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत, जे सध्या तरुण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
अभिनेत्याने त्याच्याच चित्रपटाचा मोडला रेकॉर्ड
या चित्रपटाने शाहिद कपूरच्या करिअरमधील एक विक्रमही मोडला आहे. ‘ओ रोमियो’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईने त्याच्या मागील देवा या चित्रपटापेक्षा सरस कामगिरी केली आहे. ‘देवा’ने पहिल्या दिवशी सुमारे 5.50 कोटी रुपयांची कमाई केली होती तर नव्या चित्रपटाने त्यापेक्षा चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे निर्मात्यांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 125 ते 150 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून तो वसूल करणे चित्रपटासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
चित्रपटाची कथा 90च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. गुन्हेगारी, सत्तासंघर्ष आणि प्रेम यांचा संगम यात पाहायला मिळतो. शाहिद कपूरने ‘उस्तारा’ नावाच्या धोकादायक कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारली आहे.
शहर
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
महाराष्ट्र
- मुख्यमंत्री विजय यांची 'नायक' स्टाईल कारवाई! दोन महिन्यांतच DVAC संचालक ए. अरुण यांची उचलबांगडी; सी. मदेश्वरींकडे धुरा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
























Subscribe to my channel




