छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून व पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची त्याच्याच मेडिकलमध्ये शिरून पोटात धारदार चाकू भोसकून हत्या करण्यात आली. हर्मूलच्या कोलठाणवाडी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी हा थरार घडला. शेख मोहम्मद फैसल अब्दुल कादर (वय २२, रा. उमर कॉलनी, हसूल) असे मृताचे नाव आहे. हर्सल पोलिसांनी मुख्य आरोपी रेहान अमीन पटेल (२५, रा. करीमनगर, हसूल) आणि त्याचा साथीदार समीर रईस शेख (२२, रा. हर्सल) या दोघांना सावंगी फुलंब्री परिसरातून ९ तासांत अटक केली.
फैसलने हर्सलच्या करीमनगरमध्ये औषधी दुकान सुरू केले होते. फैसलचे मोठे भाऊ शेख मुस्ताकीम यांच्या तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वी मुख्य आरोपी रेहानसाठी त्याच्या कुटुंबाने फैसलच्या धाकट्या बहिणीसाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तिचे लग्न आधीच दुसरीकडे ठरल्याने फैसलच्या कुटुंबाने नकार कळवला. गुंड प्रवृत्तीच्या रेहानने हा राग मनात धरला होता. रेहान सतत फैसल, त्याच्या कुटुंबाला त्रास देत होता. त्यांच्या घर, दुकानासमोरून मोठ्या आवाजात बुलेट पळवणे, आरडाओरड करून हुज्जत घालणे, रस्त्यात खुन्नस देणे, इशारे करून धमक्या देत होता.
तीन दिवसांपूर्वी मेडिकल पेटवले, अन् शुक्रवारी थेट जीव घेतला
रेहान इंटरनेट केबल ऑपरेटर म्हणून काम करतो. सुशिक्षित कुटुंबातील असूनही रेहान नशेखोर, गुंड प्रवृत्तीच्या तरुणांच्या संगतीत राहत होता. तीन दिवसांपूर्वीच त्याने फैसलचे दुकान जाळले होते, असा फैसलला संशय होता. शुक्रवारी फैसल दुकान उघडून शांतपणे कुराण पठण करत बसला होता. दुपारी १ वाजता रेहान, समीरने मेडिकलमध्ये घुसून फैसलला मारहाण करत दुकानाबाहेर ओढले. रेहानने धारदार चाकू फैसलच्या पोटात खोलवर भोसकला. वार इतका भीषण होता की, चाकू पोटातच सोडून आरोपी पसार झाले. मेडिकलसमोरच पोलिसांना चाकूचे पाकीटही सापडले.
'माझ्या निष्पाप मुलासोबत इतके अमानुष कृत्य का?'
घटनेनंतर स्थानिकांनी जखमी फैसलला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, चाकू खोलवर घुसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील हुशार, समंजस आणि जबाबदार मुलगा गमावल्याने नातेवाईकांनी टाहो फोडला. 'हमारे नेक बच्चे के साथ ऐसा सलूक क्यू ? सभी दोषी को गिरफ्तार करो', असा आक्रोश करत संताप व्यक्त केला. फैसलच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
जिल्हाभर फिरले, रात्रीपर्यंत अटक
पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनोज पगारे, हर्सलच्या निरीक्षक स्वाती केदार, सहायक निरीक्षक सचिन सदाफुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार फिरोज तडवी, मोहन सिंगल, आकाश जायभाय, अश्विनी गाडेकर यांनी कच्ची घाटी, पीरवाडी, रसूलपुऱ्यासह खुलताबादेत आरोपींचा शोध घेतला. हत्येनंतर मारेकरी जिल्ह्याबाहेर पळण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी रात्रीपर्यंत रेहान आणि समीरला सावंगी फुलंब्री परिसरातून मुसक्या आवळल्या. मृत फैसलच्या भावाच्या तक्रारीवरून हसूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel





Thiis iis a topic whuch iss close tto my heart… Thank you!
Exactly wyere are yohr contact details though? xnxx
My wehpage https://sexclips.cc/