पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!

पुणे: गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पर्यावरणपूरक विसर्जनास प्रोत्साहन देण्यासाठी विविध पातळ्यांवर यंत्रणा सज्ज केली आहे. यामध्ये ३८ घाट, ५८ बांधलेले हौद आणि ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मागील दहा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (दि. २५)) विसर्जन मिरवणुकीने होत आहे. ही विसर्जन मिरवणूक शनिवारी ((दि. २६)) दुपारपर्यंत चालणार आहे. विसर्जन मिरवणुकीस राज्यभरातील व राज्याच्या बाहेरीलही गणेश भक्त शहरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्लीपिंग, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमन दल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदीकिनारी विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत, अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे. सर्व घाटांच्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता बसण्यासाठी खुर्चा, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच जीव रक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्यांची ज्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती कामे करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सूचना फलक आदी तयारी करण्यात आली आहे.


वाघोली येथे खाणीची व्यवस्था
बांधलेल्या हौदांमध्ये आणि लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे पुनर्विसर्जन करण्यासाठी वाघोली येथे खाणीची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जमा होणाऱ्या मूर्तीचे तेथे नियोजनबद्ध पद्धतीने पुनर्विसर्जन केले जाणार आहे.

विसर्जनासाठी महापालिकेची सुविधा
* ३८ घाट
* ५८ बांधलेले हौद
* ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या
* २२४ मूर्ती संकलन केंद्रे
* ४५ शाडूमाती संकलन केंद्रे
महापालिकेने काय तयारी केली....
- गणेशमूर्ती दान करण्यासाठी शहरात २२४ मूर्ती संकलन केंद्रे
शाडूमातीच्या मूर्ती व शाडूमाती संकलनासाठी ४५ केंद्रे
निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी २६७ ठिकाणी ३५८ निर्माल्य कलश व कंटेनर
स्वच्छता आणि अन्य व्यवस्थेसाठी १६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, १६१ आरोग्य निरीक्षक, २९२ मुकादम आणि ४१७९ कायम सफाई सेवक
- क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार १६७० वाहने उपलब्ध
- सार्वजनिक, सुलभ आणि सशुल्क स्वच्छतागृहे नागरिक व पर्यटकांसाठी मोफत उपलब्ध

महापालिकेचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी शहरातील नदी, तलावांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन न करता नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळावे आणि महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!”

  1. Woman’s asss slaped bby ghostPakistani girl nicde fuckingFind udist beachesPretty older women for sexMedium facia peelBlack bigg shemale anal sexAsiuan tewns posingHow to
    get videos from you pornFabric kimono vintage xnxx Vanessa hudgerns sex tape viewCum a
    facutAddicting gajes com spank the monkeyEscor services martin county flJockey promise modal bikini womenFreee audio adult storiesHentai porn teen girlsThe loan fforced ssex tory xnxxindo.cc Sexy japannese lingerieDirty
    daghter caught masterbatfing with dildoComing documentary gay homosexuality in liberation life play u.s.aCork bottom
    wedgesLatex housewifesPoorn parody torrentDo redheads mind being called gingerLesbian drink breast milk xnxxx My wife’s podn moviesMento guiding the jjourney
    of adult learnerAgee costa in legal rica sexDemand fist make slam tableGirrl deep throats whille calling boyfriendRespirator sexFree
    pkrn in newark nottsYoung girls using a machine fuckLong egged xxxx teenBloomingdale vintage hatsGay rimmersPearl
    diamond bdsmBloondes fuck slutloadStrip clubs tampa areaAccessory asiasn ebay mootor motorcycle part partPaige mons anmal tube

    Visit my blog: random[0-9]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *