ठाणे: जिल्ह्यातील शहापूरमध्ये एक संतापजनक घटना घडली. ओळखीतील तरुणानेच एका ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. तो अधून मधून घरी याचचा. सगळे त्याला ओळखायचे. पण, त्याच्या मनातील वासनांध वृत्तीचा त्यांना अंदाज आला नाही. खाऊचे आमिष दाखवून त्याने ७ वर्षाच्या मुलीला सोबत नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलीचे पोट दुखायला लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. शहापूर शहरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश हरी कुंडे असे आरोपीचे नाव आहे. ३० वर्षीय गणेश याच्याशी पीडित मुलीच्या कुटुंबीयाची चांगली ओळख होती.
पीडित मुलीच्या आईने पोलिसांना काय सांगितले?
पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, महिला कुटुंबासह शहापूर परिसरात राहते. संशयित आरोपी हा त्याच परिसरात राहतो. कुटुंबीय त्याला चांगले ओळखत होते. तो अनेकदा पीडित मुलीच्या घरी यायचा. याच ओळखीचा त्याने गैरफायदा घेतला.
तक्रारीनुसार, आरोपी गणेशने ७ वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
पोटात दुखायला लागले आणि बलात्काराची घटना समोर आली
पीडित मुलीच्या आईने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, १७ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागले. तिने याबद्दल आईला सांगितले. आईने तिला विचारलं, तर तिने काही महिन्यापूर्वी घडलेली घटना सांगितली. गणेश याने तिच्यासोबत जे केले, ते कुटुंबीयांनी ऐकल्यानंतर ते हादरलेच. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
या घटनेप्रकरणी शहापूर पोलिसांनी आरोपी गणेश कुंडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४ (२), ६५ (म), ३५९ (२) तसेच पोक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी आरोपी गणेश हरी कुंडे याची आधीपासूनच ओळख असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. या विश्वासाला आणि ओळखीला तडा देत आरोपीने लहान मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून हा घृणास्पद प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१७ नोव्हेंबर रोजी मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिने आईला त्याबाबत सांगितले. आईने आपुलकीने विचारपूस केल्यानंतर मुलीने काही महिन्यांपूर्वी घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला. या प्रकाराची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पुढे येत पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे शहापूर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय व समुपदेशन मदत देण्यासोबतच पसार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथकांद्वारे तपास सुरू आहे.
शहर
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धीवर पुन्हा दगडफेक! सावंगीजवळ वाशिमच्या शासकीय वाहनाची काच फुटली; पाच जण थोडक्यात बचावले
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
गुन्हा
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
























Subscribe to my channel




