छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी सावंगी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींनी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. धावत्या वाहनाच्या समोरील काचेवर दगड आदळल्याने काच फुटून मोठे नुकसान झाले. वाहनात चालकासह पाच जण होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सर्वजण हादरून गेले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत कुठेच वाहन न थांबवल्याने मोठा अनर्थ टळून दगडफेक करणाऱ्यांचा हेतू साध्य झाला नाही.
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड सहकाऱ्यांसह गुरुवारी पुण्याच्या दिशेने निघाले होते. पुण्यात एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते निघाले होते. वाहनात चालक रामकिशन घुगे, राठोड यांच्यासह एकूण पाच जण होते. सायंकाळी ६.३० वाजता कार समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ४२६, सावंगी परिसरातून जात असताना अचानक कारवर दगडफेक झाली. दगड समोरील काचेवर आदळल्याने काच फुटली. अचानक घडलेल्या या प्रकाराने राठोड, त्यांचे सहकारी घाबरून गेले. या घटनेनंतरही न डगमगता कार थांबवण्याऐवजी चालकाने कार नियंत्रणात ठेवत घटनास्थळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर सुरक्षित ठिकाणी नेऊन उभी केली. त्यानंतर ११२ हेल्पलाईनवर संपर्क केला. समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर सावंगीच्या सुरक्षा पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले. महामार्ग पोलिसांचे पथकही दाखल झाले.
तक्रारीविना पुण्याचा प्रवास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांना जवळच्या हर्सल पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याची सूचना केली. मात्र, पुण्यातील महत्त्वाच्या बैठकीसाठी वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याने तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेत वेळ जाईल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेत गुन्हा दाखल न करताच ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. परिणामी, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.
दगडफेकीचे सत्र सुरूच
गेल्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण समृद्धी महामार्गावर लुटमार, दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. २०२३ पासूनच वैजापूर तालुक्यातील जांबरगाव आणि सुराळा परिसरात धावत्या वाहनांवर दगडफेक झाल्याच्या घटना घडत आहेत. २०२४ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात खासगी प्रवासी बसवर दगडफेक होऊन चालक आणि प्रवासी जखमी झाले होते. जून २०२५ मध्येही छत्रपती संभाजीनगर परिसरात अशा घटना घडल्या. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करमाड परिसरातच दोन दगडफेकीच्या घटना घडल्या.
शहर
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
महाराष्ट्र
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- यवतमाळ: बाबूजींच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त सुरांची स्वरांजली आणि मान्यवरांची उपस्थिती अमित कुमार व बोमन इराणी येणार यवतमाळमध्ये!
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
गुन्हा
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
























Subscribe to my channel




