पुणे: महानगरपालिकेच्या १७ तारखेला झालेल्या सर्वसाधारण सभेत फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांच्या विरोधात अंगावर फ्लेक्स पांघरून आंदोलन करणाऱ्या आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या नगरसेवकाच्याच वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स आता राजाराम पुलापासून थेट डेक्कनपर्यंत प्रत्येक चौकात, पथदिव्यांवर, नामफलकांवर आणि सिग्नलच्या खांबावर झळकताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे, नगरसेवकांच्या सभागृहातील आंदोलनानंतर आणि शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू झाल्यानंतरच हे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी पार पडलेल्या महापालिकेच्या पर्यावरणावरील सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच भाजप नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांकडे प्रशासनाचे आणि सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान सुनील पांडे आणि रवींद्र साळेगावकर यांनी अंगावर फ्लेक्स घेऊन निषेध नोंदवला होता. त्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. या आंदोलनानंतर महापालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आणि गेल्या चार दिवसांपासून शहरातील विविध भागांत अतिक्रमणांवर धडक मोहीम सुरू झाली. आगामी दोन महिन्यांत एकही दिवस ही कारवाई थांबणार नाही, कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण शहर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त केले जाईल, अशी ठाम घोषणाही आयुक्तांनी केली.
मात्र, एकीकडे शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू असताना दुसरीकडे महापालिका सभागृहात आंदोलन करून अतिक्रमण कारवाईची ठिणगी पेटवणारे नगरसेवक सुनील पांडे यांच्या वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स राजाराम पूल ते डेक्कन या पट्ट्यातील प्रमुख चौकांमध्ये, पथदिव्यांचे खांब, दिशादर्शक नामफलक आणि वाहतूक सिग्नलच्या खांबांवर लटकत असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्वे नगर, एरंडवणे, नळस्टॉप, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता आणि गुडलक चौक या परिसरांसह गल्लीबोळांतील लहान-सहान चौकांमध्येही हे फ्लेक्स उभे करण्यात आले आहेत.
शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम जोरात सुरू असताना या अनधिकृत फ्लेक्सवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यासंदर्भात विचारणा केल्यास अतिक्रमण विभागाचे अधिकारी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे बोट दाखवतात, तर आकाशचिन्ह विभाग क्षेत्रीय कार्यालयाकडे जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे. ज्यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याची आग्रही भूमिका घेतली, त्यांच्याच वाढदिवसाच्या फ्लेक्सवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने दुटप्पी धोरणाबाबत नाराजी आणि चर्चेला उधाण आले आहे.
शहर
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
महाराष्ट्र
- पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
- कोल्हापूर: ओपन हार्ट सर्जरीचा धोका टळला अकरावी दहावी शस्त्रक्रिया यशस्वी करत कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय राज्यात अव्वल
- रायगड: जागतिक मंचावर सुवर्णतेज! शिरवलीच्या शौर्या निलेश पवारची जागतिक थायबॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णभरारी
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!



























Subscribe to my channel




