पुणे: जंगली महाराज (जेएम) रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यानंतर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा बुलडोझर आता शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर धडकला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या या जोरदार मोहिमेअंतर्गत लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत असून, कारवाईच्या धास्तीने आज (दि. २०) या परिसरातील फुटपाथवर एकही पथारी व्यावसायिक बसला नसल्याचे स्थानिक दुकानदारांनी सांगितले.
या कारवाईविरोधात आता पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आक्रमक होऊन थेट रस्त्यावर उतरले आहेत. लक्ष्मी रस्त्यावर कारवाई सुरू असताना रांका आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
कारवाईच्या ठिकाणी पोहोचलेल्या फत्तेचंद रांका यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. "तुम्ही एक बोर्ड तोडूनच दाखवा," असे थेट आव्हान त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश येत नाही, तोपर्यंत कारवाई थांबवण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यावर अधिकाऱ्यांनी रांका यांनाच वरिष्ठ साहेबांकडे जाऊन भेटण्यास सांगितले. यावरून संतप्त झालेल्या रांका यांनी, "आम्ही साहेबांच्या मागेपुढे फिरायचा काही संबंध नाही. ही तुमची जबाबदारी आहे, आमची नाही. आम्ही किती वेळा गेलो, पण साहेब फोन बंद करून बसतात. तुम्हीच साहेबांना फोन लावा किंवा कारवाई थांबवायला सांगत आहेत, त्यांना इथे बोलवा," अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.
अधिकाऱ्यांशी वाद घालताना रांका यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. पुण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि आता मी 'पुणे बंद'ची हाक देऊ का, असा थेट इशारा रांका यांनी यावेळी दिला. काही दुकानांचे बोर्ड तीन-तीन फूट पुढे आले असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, "मग त्यांना आधी नोटीस काढा. हे बोर्ड आजच लावलेले नाहीत, इतकी वर्षे तुम्ही झोपला होतात का? पैसे घेऊनच परवाने काढले आहेत ना?" असा सवाल रांका यांनी उपस्थित केला.
पुण्यातील मध्यवर्ती व ऐतिहासिक बाजारपेठांपैकी एक असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा भाग म्हणून जेसीबी आणि पथकांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली. यापूर्वी जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता परिसरात करण्यात आलेल्या धडक कारवाईनंतर लक्ष्मी रस्त्यावर पथक पोहोचताच परिसरात तणाव आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुकानांच्या पाट्या व अतिक्रमणांवर कारवाई करण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना किंवा नोटीस दिली गेली नसल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली. कारवाईच्या भीतीपोटी लक्ष्मी रस्त्यावरील पदपथांवर पथारी व्यावसायिकांनी व्यवसाय थाटणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दुसरीकडे, नियमांचे उल्लंघन आणि पदपथावरील व दुकानांसमोरील अतिक्रमण हटवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे प्रशासनाच्या बाजूने स्पष्ट केले जात असले, तरी या कारवाईच्या पद्धतीवरून व्यापारी संघटना आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले. कायदेशीर प्रक्रिया, परवानग्यांची पडताळणी आणि संवादातून तोडगा काढण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत असून, पुढील काळात या मुद्द्यावरून शहरात आणखी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धीवर पुन्हा दगडफेक! सावंगीजवळ वाशिमच्या शासकीय वाहनाची काच फुटली; पाच जण थोडक्यात बचावले
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
महाराष्ट्र
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




