कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाने गुरुवारी दूध विक्री व दूध खरेदी दरात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला खरा, मात्र या बैठकीला चार अशासकीय सदस्य अनुपस्थित होते.
गोकुळच्या निवड सभेआधीच राज्य सरकारने शिवाजीराव आडनाईक, डॉ. प्रवीण हेंद्रे, कृष्णात पाटील आणि ॲड. प्रवीण पाटोळे या चारजणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करत त्यांना मताचा अधिकारही दिला. त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष निवडून आला. सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावलेले अशासकीय संचालक गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला मात्र अनुपस्थित होते.
दरवाढीने गोकुळला महिन्याकाठी २६ कोटींहून अधिकची उलाढाल
म्हैस व गाईच्या दूध विक्री दरवाढीचा घेतलेल्या निर्णयामुळे संघाच्या मासिक उलाढालीत मोठी भर पडणार आहे. संघाकडून रोज सरासरी १२ लाख लिटर म्हैस (क्रीम) दूध आणि ४ लाख लिटर गाय (टोन्ड) दूध विक्री होत असल्याचे गृहीत धरल्यास म्हैस दुधाच्या दरवाढीतून रोज ७२ लाख, तर गाय दुधाच्या दरवाढीतून १६ लाख रुपये अशी एकूण ८८ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. महिन्याला ही रक्कम सुमारे २६ कोटी ४० लाख रुपये होते.
दूध वितरकांचे एक रुपयाही कमिशन वाढवू नका, समविचारी आघाडीचा विरोध
सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, दूध संकलनात घट झाली असून प्रशासकीय काळात नफ्यात तूट आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गोकुळच्या राज्यभरातील दूध वितरकांचे एक रुपयाचेही कमिशन वाढवू नका अशी भूमिका राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या सर्व १३ संचालकांनी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडली.
दूध दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या संचालकांनी मुंबईत दूध वितरकांशी संवाद साधला होता. यावेळी वितरकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने गुरुवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, या कमिशनवाढीला समविचारी आघाडीच्या सर्व संचालकांनी विरोध दर्शविला.
आम्ही तज्ज्ञ संचालक आहोत. आमच्या चौघांची गोकुळच्या संचालक मंडळाला तज्ज्ञ सल्ल्याची जेव्हा गरज भासेल आणि ते आम्हाला बोलवतील तेव्हा आम्ही नक्की जाऊ. गरज असेल तेव्हा सल्ला देण्यासाठीच आमची नियुक्ती झाली आहे...
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या आर्थिक निर्णयांकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. म्हैस आणि गाईच्या दुधाच्या विक्री दरातील सुधारणेमुळे दैनंदिन आणि मासिक उलाढालीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, संघाच्या आर्थिक स्थितीला यातून बळकटी मिळू शकते.
दुसरीकडे, पशुखाद्याचे दर वाढवण्याबाबत संचालक मंडळाने नकार दिल्याने पशुपालक व दूध उत्पादकांवर अतिरिक्त भार पडू नये, अशी काळजी घेतल्याचे चित्र दिसून येते. तसेच दूध वितरकांच्या कमिशनवाढीच्या मुद्द्यावर राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या संचालकांनी सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थिती, संकलनातील घट आणि मागील काळातील नफ्यातील तुटीचा दाखला देत ठाम विरोध नोंदवला.
नियुक्त अशासकीय सदस्यांनी स्वतःच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देत, गरज भासल्यावर आणि बोलावणे आल्यानंतरच तज्ज्ञ सल्ला देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गोकुळच्या कारभारातील सत्तासमीकरणे, आर्थिक निर्णय आणि विविध गटांतील भूमिका आगामी काळातही चर्चेत राहणार आहेत.
शहर
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धीवर पुन्हा दगडफेक! सावंगीजवळ वाशिमच्या शासकीय वाहनाची काच फुटली; पाच जण थोडक्यात बचावले
महाराष्ट्र
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा

























Subscribe to my channel




