नाशिक: वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात 'जय भीम Gen-Z' कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी युवकांचे भविष्य या विषयावर युवकांना मार्गदर्शन करतानाच युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. युवकांकडून त्यांचे म्हणणेही जाणून घेतले. नाशिकमध्ये कार्यक्रम असल्याने प्रामुख्याने नाशिककरांना सध्या सतावणारे खड्डेमय रस्ते, अशुध्द पाणी हे विषयही या कार्यक्रमात मांडण्यात आले.
तरुणांशी संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू, अपघात हा विषय मांडत यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला. त्यावर सुजात आंबेडकर यांनी खड्ड्यांमुळे मृत्यू होत असल्याने त्यास राजकारणी, ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले. आपण एकदा चोरी झाल्यावर घराला कुलूप लावतो, मग आपल्याला जे लुटत आहेत, आपण त्यांना का निवडून देतो, असा प्रश्न उपस्थित करुन सुजात आंबेडकर यांनी चोराला मार्ग दिला तर तो चोरी करेलच, असे नमूद केले. आपण संसदेत चांगली माणसे का पाठवत नाहीत, असा प्रश्न विचारुन तरुणांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही सुजात आंबेडकर यांनी केले.
राज्यात होत असलेल्या वृक्षतोडीसंदर्भात त्यांनी नेत्यांवर टीका केली. तसेच वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांचे कौतुकही केले. टोरंट हा भाजपचा देणगीदार आहे. ही कंपनी गुजरातची आहे. टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील झाडे तोडली जात आहेत. राज्यात झाडे तोडणारी कंपनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या विरोधकांना इलेक्ट्रॉन बाउंडच्या माध्यमातून पैसे देते आणि गप्प करते, असा आरोपही त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडी डेटा सेंटर विरोधात लढा उभारत असून यांना देशाबाहेर पाठवायचे आहे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी भीमाशंकर-कर्जत परिसरातील २७८ हेक्टरवरील ३२ हजार वृक्षांची तोड होणार असून त्यासंदर्भातील चित्रफितही सुजात आंबेडकर यांनी दाखवली.
नाशिकच्या दत्तनगर, अंबडमधील दूषित पाण्याच्या चित्रफिती दाखवून त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधला. पाण्यात क्रोमियमचे प्रमाण ०.५ मर्यादेऐवजी ४५ आणि विहिरीत ९०० पीपीएम आढळल्याने २५ हजार नागरिकांना त्रास होत असून चारशेपेक्षा अधिक नागरिकांना त्वचारोग झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक शहरात जे पिवळे पाणी येते, ते केमिकलयुक्त पाणी आहे. या निष्काळजीपणासाठी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न त्यांनी केला. पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शुध्द हवा हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे. परंतु, सरकार हा अधिकार हिरावून घेत असताना तुमचे रक्त का खवळत नाही, असा प्रश्नही सुजात आंबेडकर यांनी केला. सर्वजण आपल्या भविष्याला चुना लावत असल्याने आपले भविष्य आपल्यालाच हातात घ्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडलेल्या 'जय भीम Gen-Z' संवादात नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी दैनंदिन जीवन, नागरी सुविधा, पर्यावरण आणि लोकशाहीतील सहभाग याविषयी थेट प्रश्न मांडत आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात आणि त्यातील जबाबदारीचा मुद्दा विद्यार्थ्यांनी प्रकर्षाने पुढे आणला.
प्रदूषित पाणी आणि रासायनिक सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर बोलताना सुजात आंबेडकर यांनी दत्तनगर आणि अंबड परिसरातील परिस्थितीची वस्तुस्थिती मांडली. पाण्यातील क्रोमियमचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच नागरिकांना सहन करावा लागणारा त्वचारोग व आरोग्याचा धोका याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वच्छ पिण्याचे पाणी व शुद्ध हवा हे मूलभूत आणि घटनात्मक अधिकार असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
पर्यावरण रक्षणाच्या प्रश्नावर बोलताना भीमाशंकर-कर्जत परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड, प्रकल्पांच्या नावाखाली होणारा निसर्गाचा ऱ्हास आणि त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचा उल्लेख करण्यात आला. तरुणांनी केवळ प्रश्न विचारण्यापुरते मर्यादित न राहता राजकीय निर्णयप्रक्रियेत जागरूकपणे सहभागी व्हावे, योग्य उमेदवारांची निवड करावी आणि स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या संवादातून करण्यात आले.
शहर
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- छत्रपती संभाजीनगर: ड्युटी संपवून घरी निघालेल्या सुपरवायझरवर काळाचा घाला! वाळूज एमआयडीसीत कंपनीच्याच बसच्या धडकेत मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी
- पुणे: अतिक्रमणांविरोधात रान उठवणाऱ्या नगरसेवकाच्याच वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स! डेक्कनपासून कर्वे रस्त्यापर्यंत बॅनरबाजी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- छत्रपती संभाजीनगर: ड्युटी संपवून घरी निघालेल्या सुपरवायझरवर काळाचा घाला! वाळूज एमआयडीसीत कंपनीच्याच बसच्या धडकेत मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी
- पुणे: अतिक्रमणांविरोधात रान उठवणाऱ्या नगरसेवकाच्याच वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स! डेक्कनपासून कर्वे रस्त्यापर्यंत बॅनरबाजी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




