
Babar Azam : विश्वचषकादरम्यान एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पाकिस्तानी मीडिया सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, क्रिकेट बोर्ड आणि माजी क्रिकेटपटूंच्या वागणुकीमुळे निराश झालेला बाबर आझम भारतातून पाकिस्तानला परतल्यानंतर एकदिवसीय आणि टी२० संघाचा राजीनामा देऊ शकतात. पाकिस्तानचा संघ अजूनही विश्वचषक २०२३ मध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे, परंतु पात्र होण्याची शक्यता खूपच धूसर आहे.
विश्वचषक २०२३ मध्ये खराब कामगिरी
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची कामगिरी काही खास नव्हती, त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच बाबर आता कर्णधारपद सोडू शकतो. सूत्रांकडून अशीही बातमी समोर येत आहे की, कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद हे त्याच्याचकडे ठेवले जाऊ शकते. विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांत आठ गुण झाले आहेत. संघाचा शेवटचा साखळी सामना आज (११ नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी, संघाला मोठा विजय नोंदवावा लागेल, कारण न्यूझीलंडची निव्वळ धावगती +०.७४३ आहे तर पाकिस्तानची +०.०३६ आहे.
|
Virat Kohli Century : किंग कोहलीने घडवला इतिहास! वाढदिवशीच सचिनच्या शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी |
पाकिस्तानी माध्यमांनुसार, बाबर आझमने त्याच्या जवळच्या लोकांशी आणि पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू रमीझ राजा यांच्याशी त्याच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा केली आहे. आपल्या जवळच्या लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार होणार की नाही याचा निर्णय घेईल. मात्र, त्याच्या जवळच्या काही लोकांनी त्याला खेळाच्या तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्यास सांगितले आहे. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर तो माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आहे.
बाबरने स्वतः ‘हे’ वक्तव्य केले आहे
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान संघाच्या शेवटच्या साखळी सामन्याआधी, जेव्हा बाबर आझमला त्याच्या कर्णधारपदाचा निर्णय कधी घेणार असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सूचक विधान केले. त्याने सांगितले की, “पाकिस्तानला परतल्यानंतर तो मी यावर योग्य निर्णय घेईन.” त्याने कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे होतेच पण २०२३चा विश्वचषक त्याच्या वैयक्तिक कामगिरीबाबतही फारसा काही खास नव्हता. त्याने आठ सामन्यात केवळ २८२ धावा केल्या आहेत. येत्या काही दिवसात बाबर पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहणार की नाही हे लवकरच कळेल.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




