
Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे-मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत, विरोधकांचा समचार नाही तर छातीवर पाय देऊन समाचर घेऊ", असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील
राज्यात मोगलाई सुरू आहे.आता आमच्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहेत. बाळासाहेब ठाकरे या शाखांना मंदिरं मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुब्र्यात येण्यापासून पोलीस रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहेत. पोलिसांसमोर बॅनर फाडत आहेत.जे आता आम्हाला अडवात होते, त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते?. जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत त्यांना एवढंच सांगत आहोत, 31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील", असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
|
|
पोलिसांना आव्हान, अडवून दाखवा
मी पोलिस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत, तुम्ही आम्हाला अडवून दाखवा.जेव्हा शाखा तोडली जात होती तेव्हा पोलीस झोपेल होते का? आता पोलीस सक्रिय झाले आहेत. आमचा DNA बाळासाहेब ठाकरे आहे. आम्ही मुंब्राला जाणार आहोत अडवून दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी केलं.
एकनाथ शिंदे गँगला जावच लागेल
मी वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदे जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत.एकनाथ शिंदे यांच्या गँगला जावच लागेल. पुढे मुख्यमंत्री कोण असेल हे माहिती नसेल पण सरकार बदलेल. पोलिस आयुक्तांना आव्हान करतो आम्ही येत आहे तुम्ही आम्हाला अडवून दाखवा, असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांवर प्रतिक्रिया
आजारी असताना अजित पवार दिल्लीत गेले. हसण्यासारखे आहे. आपल्याकडे तब्येत ठीक नसेल तर आपण त्यांना जाऊन भेटतो, पण इथे उलटे आहे. आजारी माणूस स्वत: जाऊन भेटत आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
उद्धव ठाकरे मुंब्रा दौऱ्यावर
मुंब्य्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज उद्धव ठाकरे मुंब्य्रातील शाखेला भेट देणार आहेत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यावेळी संजय राऊतही उपस्थित असतील. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला उद्धव ठाकरे हे स्वतः सायंकाळी भेट देणार आहेत.
मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे.
आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदें चे कट्टर समर्थक असणारे राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंब्रा या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांचा दौरा असल्याने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. ठाणे पोलिसांनी मुंब्र्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण दौऱ्यावर लक्ष ठेवलं जात आहे. ठाणे पोलिसांनी SRPF आणि इतर पोलिस दलांसह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संपूर्ण रॅली आणि कार्यक्रमावर पोलिस ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार आहेत. शिंदे पक्ष आणि उद्धव ठाकरे पक्षांच्या सदस्यांसह दोन्ही पक्षांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली होती.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




