कोल्हापूर: जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील खानापूर येथे शेताच्या तारेच्या कुंपणास बेकायदेशीररीत्या विद्युत पुरवठा (इलेक्ट्रिक सप्लाय) दिल्याने जोरदार शॉक लागून एका ६४ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भागोजी सदू जाधव (वय ६४, रा. खानापूर, ता. आजरा) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नव्याने खरेदी केलेला बैल टेम्पोतून उतरवताना अचानक उधळल्याने त्याला पकडण्यासाठी ते शेतात गेले असताना 'आंबेशेत' नावाच्या शेतात हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेत शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी सुषमा सुभाष राणे आणि जितेंद्र सुभाष राणे (दोघेही रा. खानापूर) या मायलेकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भागोजी जाधव यांना शर्यतीचा बैल पाळण्याचा मोठा छंद होता. या छंदापोटी त्यांनी कालच एक नवीन बैल खरेदी केला होता. आज (दि. २१ नोव्हेंबर २०२६) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गावात टेम्पोतून हा बैल खाली उतरवला जात असताना अचानक बैल बिथरून टेम्पोतूनच उधळला आणि शेताच्या दिशेने पळू लागला. उधळलेल्या बैलाला पकडण्यासाठी भागोजी जाधव यांच्यासह टेम्पो चालक संभाजी तेजम, ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय डांगरे आणि मुलगा दिगंबर जाधव हे तातडीने बैलाच्या पाठोपाठ धावले.
दरम्यान, त्या परिसरातील आंबेशेत नावाच्या शेताच्या घरातील विद्युत पुरवठा सुषमा राणे आणि जितेंद्र राणे यांनी शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणाला सोडला होता. बैलाला पकडण्याच्या घाईत असताना भागोजी जाधव यांचा त्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या कुंपणाला अचानक स्पर्श झाला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
पाठोपाठ आलेले मुलगा दिगंबर जाधव, टेम्पो चालक संभाजी तेजम आणि ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय डांगरे यांनी तात्काळ लाकडी काठी व दोरीच्या सहाय्याने अत्यंत सावधगिरीने भागोजी जाधव यांना तारेपासून बाजूला काढले आणि उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण खानापूर गावावर शोककळा पसरली असून, भागोजी जाधव यांच्यावर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.
तारेच्या कुंपणाला घरातील विद्युत पुरवठा जोडल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही सुषमा व जितेंद्र राणे यांनी अत्यंत बेजबाबदारपणे तारेच्या कुंपणाला वीजप्रवाह दिला होता, अशी तक्रार व फिर्याद मृताचे पुत्र दिगंबर जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी सुषमा राणे आणि जितेंद्र राणे या दोघांवर गुन्हा दाखल करून सायंकाळी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे हे करीत आहेत.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




