पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या तसेच पुढे ग्रामीण भागातून जाणाऱ्या मुळा, मुठा आणि भीमा नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे. या नद्यांच्या पात्रांना जलपर्णीचा (Water Hyacinth) प्रचंड विळखा पडला असून मोठ्या प्रमाणावर साचलेला प्लास्टिक कचरा यामुळे नदीचे स्वरूप अक्षरशः सांडपाण्याच्या नाल्यासारखे झाले आहे. या वाढत्या जलप्रदूषणाचा थेट आणि अत्यंत विपरित परिणाम नदीकाठच्या गावामधील नागरिकांच्या आरोग्यावर, शेतीवर आणि मुक्या जनावरांवर होऊ लागला आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये आजारांचा धोका वाढला:
पुणे शहर व परिसराचे सांडपाणी आणि औद्योगिक रासायनिक कचरा विनाप्रक्रिया नदीत सोडला जात असल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत मोठी घट झाली आहे. हे दूषित पाणी वाहत जाऊन रांजणगाव सांडस, वाळकी बेट परिसर आणि दौंड-शिरूर पट्ट्यातील भीमा नदीला मिळते. या दूषित पाण्यामुळे आणि जलपर्णीच्या प्रादुर्भावामुळे नदीकाठच्या गावांमध्ये कावीळ, गॅस्ट्रो, उलटी-जुलाब यांसारख्या संसर्गजन्य आजारांसह किडनी स्टोन आणि विविध त्वचेच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. नदीकाठच्या सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.
शेतकरी आणि पशुधनासमोर मोठे संकट:
नदीतील प्लास्टिक आणि जलपर्णीचा सर्वाधिक फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. नदीपात्रातून सिंचनासाठी पाणी उपसताना वीजपंपाच्या (Electric Pump) फुटव्हॉल्व्हमध्ये सतत प्लास्टिक आणि जलपर्णी अडकते. परिणामी, रात्री-अपरात्री पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून अंधारात नदीपात्रात उतरून कचरा साफ करावा लागतो. तसेच, शेतात हे दूषित पाणी सोडल्यानंतर पाण्याचा मोठा फेस तयार होतो, ज्यामुळे पिकांच्या वाढीवर आणि जमिनीच्या सुपीकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या दूषित पाण्याचा फटका दुधाळ जनावरांच्या आरोग्यावरही होत असून, जनावरांनी हे पाणी पिण्याचे टाळल्याचे दिसून आले आहे. महापूर आल्यानंतर नदीकाठच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक अडकून राहते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने हा कचरा वर्षानुवर्षे तिथेच राहतो आणि पाण्याची पातळी वाढल्यावर पुन्हा नदीपात्रात मिसळतो, ज्यामुळे प्रदूषण वाढण्याचे दुष्टचक्र अखंड सुरू आहे.
तज्ज्ञांचे मत आणि आरोग्याची काळजी:
बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जलप्रदूषण, क्षारपड जमिनी आणि अन्नपदार्थांमधील रासायनिक घटकांचा अतिरेक यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. दूषित हवेमुळे श्वसनविकार तर दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार बळावत आहेत. या गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी ताраडीने ठोस पावले उचलून नदीपात्राची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




