कोल्हापूर: जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पवित्र पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील सांडपाणी समस्या आणि प्रदूषणमुक्तीच्या कामांचा सखोल आढावा घेत, २०२७ पर्यंत सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP Plants) पूर्ण करण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत.
नदीपात्रात सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि संबंधित यंत्रणांना कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या सर्व एसटीपी (Sewage Treatment Plant) प्रकल्पांची कामे निर्धारित मुदतीत म्हणजेच २०२७ पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे.
औद्योगिक प्रकल्पांच्या तपासणीचे आणि अहवालाचे आदेश
केवळ सांडपाणीच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील रेड झोन, साखर कारखाने आणि इतर प्रदूषित क्षेत्रांमधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (CETPs) क्षमता आणि प्रत्यक्षात सुरू असलेला वापर याची कसून तपासणी करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकल्पांचा वापर करणे अपेक्षित असलेले औद्योगिक घटक आणि प्रत्यक्षात वापर करणारे घटक यांची पडताळणी करून येत्या आठ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) दिले आहेत.
२०७ कोटींचा प्रस्ताव पुनरुज्जीवन प्राधिकरणाकडे
पंचगंगा नदी खोऱ्यातील आणि नदीकाठच्या ८९ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी तब्बल २०७ कोटी ४७ लाखांचा एक महत्त्वाचा प्रस्ताव 'महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाकडे' पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावरही पर्यावरण विभागाने गांभीर्याने लक्ष घातले असून, भविष्यातील लोकसंख्या वाढीचा अंदाज घेऊनच गावागावांत सांडपाणी व्यवस्थापन आणि जैविक प्रक्रिया प्रकल्प उभारले जावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
या बैठकीदरम्यान माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चर्चेत सहभाग घेत नदी प्रदूषणाचे वास्तव मांडले. केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात प्रकल्पांची अंमलबजावणी करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




