छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या एका थरारक आणि हृदयद्रावक दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे देवळाई-सातारा, तिसगाव आणि संपूर्ण संभाजीनगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, लहान मुलांमधील वाढत्या मानसिक ताणतणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मृतक तरुण १८ वर्षीय कुणाल मुरलीधर चांदगुडे असे त्याचे नाव आहे. कुणाल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता, त्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२ टक्के गुण मिळवले होते आणि त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. तो सध्या अकरावीच्या वर्गात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, कुणालने काही दिवसांपूर्वी एक आयफोन (iPhone) खरेदी केला होता. या आयफोनचे हप्ते (EMI) थकले होते आणि त्यावरून घरगुती पातळीवर काही आर्थिक ताणतणाव निर्माण झाला होता. वडील खर्चासाठी पैसे देत नाहीत आणि मोबाइलचे हप्ते थकल्यामुळे घरात काहीसा वाद झाला होता. याच गोष्टीचे मनावर ओझे घेत कुणाल अत्यंत टोकाच्या भूमिकेत गेला.
शुक्रवारी सकाळी साधारणपणे १० वाजता कुणाल रागाच्या भरात तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर पोहोचला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागला. कुटुंबातील सदस्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आईवडील (मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
डोंगरावर चाललेला तो तीन तासांचा थरार आणि आर्त विनवणी
कुणाल डोंगराच्या अत्यंत उंच आणि धोकादायक कड्यावर उभा होता. तिथे उपस्थित स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान यांनी त्याला तब्बल तीन तास समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्याची आई संगीता चांदगुडे यांनी मुलाला वाचवण्यासाठी अत्यंत भावनिक आणि हतबल होऊन टाहो फोडला. “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस,” अशी आर्त विनवणी करत त्या मुलाच्या पाया पडल्या, जमिनीवर डोकं ठेवलं. “तुला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचे सोल्युशनच नाही,” असे म्हणत कुणाल पूर्णपणे खचला होता.
एकापाठोपाठ एक तिघांचे जाणे
डोंगराच्या कड्यावर कुणाला सुरक्षितपणे मागे ओढण्याच्या प्रयत्नात असताना वडील मुरलीधर चांदगुडे यांचा अचानक तोल गेला आणि ते कड्यावरून खाली कोसळले. वडिलांना पडताना पाहताच मुलगा कुणाल आणि वडील दोघेही खाली १५० फूट खोल कोसळले. आपल्या डोळ्यांसमोर पती आणि पोटचा मुलगा दरीच्या खांद्यात कोसळल्याचे दृश्य पाहून आई संगीता चांदगुडे यांना हा तीव्र धक्का सहन झाला नाही. या प्रचंड मानसिक आघातातून त्यांनीही पाठोपाठ डोंगरावरून खाली उडी मारली. या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलगा तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास आणि यंत्रणेची कारवाई
या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून तात्काळ नोंद करण्यात आली असून, आयफोनच्या हप्त्यांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावाच्या आणि कौटुंबिक वादाच्या सर्व अँगलने सखोल चौकशी केली जात आहे. एका मोबाईलच्या हप्त्यावरून आणि छताखालच्या छोट्याशा वादातून संपूर्ण हसतेखेळते कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी
- नाशिक: कावळा की गिधाड? नाशिककर मतदानातून निवडणार आपल्या शहराचा अधिकृत पक्षी; पर्यावरण संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम!
- पुणे: छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनर्सवर शिवरायांचे फोटो लावण्यावरून रुपाली ठोंबरे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर भडकल्या!
- नागपूर: आंदोलनाचे राजकारण नको, समस्यांवर उपाय शोधा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: अत्यंत हृदयद्रावक घटना! लग्न ठरून घरी वधूचे पाहुणे येणार त्यापूर्वीच क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- सातारा: कराड-चिपळूण मार्गावर थरारक अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात एक जीप खोल दरीत कोसळली तर दुसरी उलटली, दहा प्रवासी गंभीर जखमी
- पुणे: मोरगावच्या श्री मयुरेश्वराचा दसरा सोहळा तब्बल १५ तास रंगला; दीड ते दोन लाख भाविकांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात उत्सव संपन्न!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!





























Subscribe to my channel




