पुणे: पुणे महानगरपालिकेच्या ९० कोटी रुपयांच्या एका वादग्रस्त रस्त्याच्या कामावरून आणि भाजपच्या एका आमदारासोबत झालेल्या तीव्र वादानंतर, महापालिका आयुक्तांनी विकासकामांच्या बाबतीत अत्यंत सावध भूमिका पत्करली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरात नवीन होणारी कामे, काढल्या जाणाऱ्या निविदा आणि विविध प्रलंबित प्रक्रियांवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. तसेच, आता शहरातील कोणत्याही अत्यावश्यक कामांसाठी उच्च पातळीवरील पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन प्रकल्पांतर्गत संगमवाडी पूल ते बंडगार्डन दरम्यानच्या नियोजित १७ मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये तब्बल ९० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेदरम्यान भाजपच्या एका स्थानिक आमदाराने एका विशिष्ट पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी आणि रस्त्याचे हे महत्त्वाचे काम आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव आणला होता. या राजकीय दबावामुळे ही निविदा प्रक्रिया काही काळ रखडली होती. मात्र, जेव्हा हा संपूर्ण प्रकार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आला, तेव्हा त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमांचे काटेकोर पालन करत निविदा प्रक्रिया पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित पथ विभागाला दिले.
नियमानुसार पार पडलेल्या या प्रक्रियेत, ज्या ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी संबंधित आमदार वारंवार दबाव आणत होते, त्याच ठेकेदाराची निविदा सर्वांत कमी दराची (L1) आली. परिणामी, आमदाराच्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळू शकले नाही. या गोष्टीचा राग मनात धरून आणि संतापलेल्या संबंधित आमदाराने थेट महापालिका आयुक्तांना मोबाईल फोनवरून ॲट्रॉसिटीची धमकी दिली. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ करत थेट विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची धमकी दिली होती. या गंभीर प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच गहजब उडाला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी कोणतीही जोखीम न पत्करता कठोर पावले उचलली आहेत. या नव्या निर्णयानुसार, महापालिकेच्या वतीने कोणत्याही नवीन विकासकामांना प्रशासकीय किंवा तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी, तसेच प्रलंबित असलेल्या कोणत्याही निविदेला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची किंवा स्वतः आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आता अत्यंत बंधनकारक करण्यात आले आहे.
आयुक्तांनी जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, महापालिका अर्थसंकल्पातील नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतून किंवा प्रभागनिहाय करण्यात येणाऱ्या तरतुदींमधून प्रस्तावित असणाऱ्या कामांनाही आता या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या विकास निधीतून किंवा त्यांच्या शिफारशीवरून शहरात होणाऱ्या विकासकामांनाही या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. दरम्यान, अतिशय तातडीची आणि नागरिकांच्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित असणाऱ्या कामांनाच केवळ आवश्यक ती विशेष परवानगी घेऊन पुढे जाता येणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप




























Subscribe to my channel




