मुंबई: विरार पश्चिम भागातील नारिंगी गावात एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेत कौटुंबिक वादातून झालेल्या धक्काबुक्कीत २८ वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राची कल्पेश पाटील असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, या प्रकरणी बोळींज पोलिसांनी आरोपी ६० वर्षीय सासरा गणपत पाटील याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून बालकावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका हत्येत झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विरार पश्चिमेकडील नारिंगी गावात असलेल्या एकूणच कौटुंबिक कलह आणि त्रासाला कंटाळून प्राची पाटील यांना त्यांच्या भावाने माहेरी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास प्राची यांचे बंधू विशाल अनंत पाटील हे त्यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी प्राची यांची अवघ्या आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आरोपी सासरा गणपत पाटील यांच्या खांद्यावर बसलेली होती. प्राची यांनी माहेरी निघण्यापूर्वी आपल्या पोटच्या लहान मुलीला सासर्यांच्या ताब्यातून स्वतःच्या हातात घेण्यासाठी पुढे हात केला. मात्र, सासरा गणपत पाटील यांनी नातंडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यास तीव्र विरोध दर्शवला.
या लहान मुलाला सोबत नेण्यावरून आणि मुलीच्या ताबा मिळवण्यावरून घरात वाद वाढला. वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात सासरा गणपत पाटील यांनी सून प्राची पाटील यांना जोराचा धक्का दिला. या अचानक दिलेल्या धक्क्यामुळे प्राची घरातच असलेल्या कठीण फरशीवर जोरात आपटून खाली कोसळल्या. या पडझडीत त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला आतून गंभीर मुक्का मार लागल्याने त्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या आठ महिन्यांची ती चिमुकली आईविना पोरकी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जयेभये, बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे आणि उपनिरीक्षक नवनाथ कदम यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली. मृत महिलेचे बंधू विशाल अनंत पाटील यांच्या फिर्यादीवरून बोळींज पोलीस ठाण्यात आरोपी सासरा गणपत पाटील याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार सदोष मनुष्यवध (कलम १०५) तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपी सासर्याला तात्काळ बेड्या ठोकल्या असून वसई सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
महाराष्ट्र
- चंद्रपूर: तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या आमदार बच्चू कडूंसह ६ जणांवर गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे पूर्णपणे दूर गेलेत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर घणाघात
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!




























Subscribe to my channel




