
Jalgaon : चेन्नईतील गोल्डन बीचवर शनिवारी झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. या दुर्घटनेनंतर वाहून गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील रहिवासी जय पाटीलचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला.
जय पाटीलचा मृतदेह सोमवारी कांथाट्टरच्या शेजारच्या गावाजवळील किनारपट्टीवर सापडला. त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाला सोपवण्यासाठी औपचारिकता सुरु आहे. शनिवारी आयटी सेवा कंपनी 'कॉग्निझंट'चे तीन इंटर्न ईस्ट कोस्ट रोडवरील गोल्डन बीच येथे फिरायला गेले होते. हे सारे एके ठिकाणी सेल्फी घेत असताना शक्तिशाली लाटांमुळे तीनजण पाण्यात ओढले गेले. या दुर्घटनेत जय पाटील बेपत्ता झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शोधकार्याला गती देण्याची विनंती केली होती.
नेमकं काय झालं?
बी. ई. शिक्षण पूर्ण केलेला जय पाटील ५ फेब्रुवारीला चेन्नईतील नामांकित ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो काही सहकाऱ्यांसोबत समुद्र किनारी फिरण्यासाठी गेला होता. या वेळी अचानक समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आणि त्यात जयसह तीन जण ओढले गेले.
आई-बहिणीपासून वृत्त लपवलं
जयचे वडील नरेंद्र पाटील शेतकरी असून, आई शिक्षिका आहे. जयच्या बहिणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे घरातील वातावरण आधीच तणावाचे आहे. बहिणीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये आणि आईला धक्का बसू नये, यासाठी या घटनेची माहिती आईला अद्याप देण्यात आलेली नाही. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईला रवाना झाले आहेत.
भंडाऱ्यातील तरुणीचाही मृत्यू
चेन्नईतील गोल्डन बीचवर सेल्फी घेत असतानाच आलेल्या उंच लाटांनी समुद्रात ओढून घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील वरठी (भंडारा रोड) येथील एका तरुणीचाही बुडून मृत्यू झाला. मयुरी हरिश्चंद्र चौधरी असे या तरुणीचे नाव आहे.
मृत तरुणीवर अंत्यसंस्कार
चेन्नई येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेली असता मृत्युमुखी पडलेली मयुरी हरिचंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी) हिच्यावर काल सोमवारी रात्री वरठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पार्थिव काल सोमवारी चेन्नईहून आणण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




