आजकाल एका आजारी नातेवाइकाच्या देखभालीसाठी माझा बहुतेक वेळ रुग्णालयात जात आहे, तेव्हा मी तिथे दोन प्रकारचे लोक पाहिले. एक ते, जे खराब प्रकृतीमुळे अंथरुणावर आहेत. दुसरे ते, जे पांढरा कोट घालून रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये चालताना चर्चा करत आहेत की कसे निरोगी जीवन जगावे आणि आयुष्य दीर्घ ठेवावे. ते कधीच असे म्हणत नाहीत की काय खाऊ नये, केवळ तेव्हाच सांगतात जेव्हा एखाद्याच्या शरीरात पोटॅशियमसारख्या खनिजांचे प्रमाण खूप जास्त होते आणि त्याला केळे न खाण्यास सांगितले जाते- कारण केळ्यात पोटॅशियम भरपूर असते. एका बरे होत असलेल्या रुग्णाजवळ बसून संवाद साधताना मला अनेक तथ्यांचा शोध घेण्याची भरपूर वेळ मिळाला. मला समजले की पृथ्वी वनस्पती आणि त्यांच्या उत्पादनांमधून आपल्याला 88 शोधण्यायोग्य आणि 118 न शोधण्यायोग्य खनिजे देते. भारतीय लोकसंख्येवर जंक फूडचा परिणाम जेव्हा ‘अर्बन लक्झरी’च्या पुढे जाऊन एक राष्ट्रीय आरोग्य आपत्ती बनत आहे, तेव्हा मला जाणवले की आपण सर्वांनी हे समजून घेण्याची नितांत गरज आहे की अन्नाला केवळ दीर्घ आयुष्याचेच नाही, तर निरोगी आयुष्याचे साधन कसे बनवता येईल. बेरी, अक्रोड, पालेभाज्या आणि मसाले हे असे काही खाद्यपदार्थ आहेत, जे ‘पॉलीफेनोल्स’ने समृद्ध असतात. हे एक वनस्पती संयुग आहे, जे हृदय, चयापचय, मेंदू आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विज्ञान सांगते की जर या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच आयुष्य केवळ दीर्घच नाही, तर निरोगीदेखील होईल. तर अखेर हे पॉलीफेनोल्स आहेत तरी काय? हे वनस्पतींद्वारे उत्पादित संयुगांचा एक विशाल आणि वैविध्यपूर्ण समूह आहे. यामुळेच त्या वनस्पतींच्या प्रजातींचे रंग आणि चव तयार होते. वनस्पती हे का बनवतात? कारण ते त्यांना अतिनील किरणांपासून आणि रोगांपासून वाचवतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण हे खातो, तेव्हा ते आपलेही संरक्षण करतात. जरी 8 हजार प्रकारचे पॉलीफेनोल्स ज्ञात आहेत, तरीही ते या चारपैकी एका वर्गाशी संबंधित असतात. 1. फ्लेव्होनॉइड्स, जे बेरी, लिंबूवर्गीय फळे, सफरचंद, पालेभाज्या, सोयाबीन, चहा आणि कोकोमध्ये मिळतात. 2. फेनोलिक ॲसिड, जे कॉफी, बेरी, संपूर्ण धान्य, लाल कांदा, नट्स, औषधी वनस्पती आणि मसाल्यांमध्ये मिळतात. 3. स्टिलबीन्स, जे बेरी, लाल द्राक्षे आणि शेंगदाण्यांमध्ये मिळतात. 4. लिग्नॅन्स, जे जवस (अळशी), तीळ आणि संपूर्ण धान्यामध्ये असतात. पॉलीफेनोल्स निरोगी पद्धतीने वय वाढवण्यास कशी मदत करतात? हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहेत आणि त्यांच्यामध्ये दाहशामक गुणधर्मदेखील असतात. हे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतात, खराब कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. हे प्रोबायोटिक आहेत, जे आतड्यांमध्ये फायदेशीर बॅक्टेरिया वाढवतात. असे मानले जाते की हे इन्सुलिनचा स्राव आणि स्नायूंच्या पेशींमध्ये ग्लुकोजचा प्रवेश सुधारतात. हे केवळ मेंदूतील रक्तप्रवाह सुधारत नाहीत, तर काही पॉलीफेनोल्समध्ये तर ‘ब्लड-ब्रेन बॅरियर’ ओलांडण्याची क्षमतादेखील असते- जे मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सुजेपासून वाचवतात. शोध असे सुचवतात की पॉलीफेनोल्स फॅट ऑक्सिडेशन वाढवून काही प्रमाणात वजन नियंत्रणातही मदत करतात. म्हणजेच ते फॅट तोडू शकतात. याचे ठोस पुरावे आहेत की पॉलीफेनोल्सने समृद्ध अन्न, विशेषतः फ्लेव्होनॉइड्स, हृदयविकारांपासून संरक्षण देते. जरी पॉलीफेनोल्सचा कोणताही रोजचा डोस निर्धारित नाही, तरीही अभ्यास सांगतात की रोज 500 ते 1500 मिलिग्रॅमचे सेवन आपल्याला जुनाट आजारांपासून वाचवू शकते. ज्या लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या वनस्पतीमध्ये किती पॉलीफेनोल्स असतात, ते मला लिहू शकतात, मी उत्तर देईन. आता आपल्या पूर्वजांच्या खाण्याच्या सवयींवर नजर टाका. वर सांगितलेली प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या अन्नात असायची. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्ही आपल्या ज्येष्ठांच्या खानपान सवयींना स्वीकारू इच्छिता की पाश्चात्त्य फास्ट फूडला. निवड तुमची आहे.
फंडा असा आहे की जगण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. तर मग आपण आपल्या दैनंदिन अन्नाला दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे साधन बनवण्याचा प्रयत्न का करू नये?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




