हिंगोली: "तू पोलिसांना आमच्या हालचालींची गुप्त माहिती (टिप) का देतोस?" या संशयावरून एका २२ वर्षीय तरुणाला भररस्त्यात अडवून विटा आणि दगडांनी ठेचून त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. हा रक्तरंजित प्रकार वसमत शहरातील सोमवार पेठ भागात गुरुवारी (दि. १०) सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडला. या घटनेने वसमत शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"आमची टिप का देतोस?" म्हणून घातला वाद
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश डिगांबर गुंडाळे (वय २२, मूळ रा. रुपला पांढरी, ता. पूर्णा, जि. परभणी; सध्या रा. पाटील नगर, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री १२:१५ वाजेच्या सुमारास गणेश हा सोमवार पेठ परिसरातून जात असताना, संशयित ऋषीकेश कठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर (सर्व रा. वसमत) यांनी त्याला रस्त्यात अडवले. "तू पोलिसांना आमच्याविरोधात खबरी का पुरवतोस?" असा जाब विचारत त्यांनी गणेशसोबत जोरदार वाद सुरू केला.
विटा आणि दगडांनी ठेचून जागीच संपवले
हा वाद काही मिनिटांतच टोकाला पोहोचला आणि तिघांनी गणेशला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. संतापाच्या भरात आरोपींनी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या बांधकाम विटा आणि मोठे दगड उचलून गणेशच्या डोक्यावर आणि छातीवर एकापाठोपाठ एक जोरदार वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशचा जागीच तडफडून मृत्यू झाला. हत्येनंतर तिन्ही हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
पोलीस पथक घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलीस दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक परगेवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
शोधमोहीम तीव्र, दोन तपास पथके रवाना प्रत्यक्षदर्शी पवन डाखोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुवारी पहाटे आरोपी ऋषीकेश कठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष शोध पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली असून, आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी व्यक्त केला आहे.
शहर
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- रत्नागिरी: सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्यात पुन्हा उफाळला वाद; नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
गुन्हा
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!


























Subscribe to my channel



