पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!

पुणे: खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर दुचाकीस्वाराने नियमांचं पालन न करता बेदरकारपणे वाहन चालवत अडथळा निर्माण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय शुभम विजय वनित याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (13 सप्टेंबर) रात्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून कोथरूड येथील त्यांच्या निवासस्थानी जात होते. त्यांचा वाहनांचा ताफा संचेती पुलावरून बर्वे चौकाच्या दिशेने जात असताना जंगली महाराज रस्त्यावर हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. 


या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांचे अंगरक्षक असलेले सहाय्यक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शुभम वनितविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुभम वनित हा आपल्या दुचाकीवरून मंत्र्यांच्या ताफ्यासमोर आला. इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने तो बेदरकारपणे आणि वेडेवाकडे वाहन चालवत होता, असा आरोप करण्यात आला आहे. याचदरम्यान त्याने ताफ्यातील एका वाहनाला कट मारला आणि त्यानंतर तो तेथून निघून गेला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत आणखी एक चर्चा समोर येत आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस संबंधित तरुणाच्या नाना पेठेतील घरी पोहोचले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले अशी माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय मंत्र्यांच्या (Murlidhar Mohol) ताफ्याला अडथळा निर्माण केल्याचा आरोप, तर दुसरीकडे मध्यरात्री पोलिसांची कारवाई झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे या प्रकरणाने पुण्याच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.


 तक्रारीत नेमकं काय आहे?
१३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास संचेती पुलावरून स.गो. बर्वे चौकाकडे जात असताना ही घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे पुणे विमानतळावरून कोथरुडच्या दिशेने ताफ्यासह (कॉन्व्हॉय) जात होते. या दरम्यान कार चालक शुभम विजय वनित याने आपली गाडी अत्यंत बेदरकारपणे, वेडेवाकडे चालवून मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मंत्री मोहळ यांच्या वाहनाला कट मारला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेफिकिरीने वाहन चालवल्यामुळे आरोपी कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ सह मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १८५ आणि ११९/१७७ अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!”

  1. I think whatt youu publishedd mace a llot of sense.
    However, wyat anout this? suppopse you were to wwrite a kiler post title?
    I ain’t suggeseting yyour information iss not solid, howeger what iff youu dded a poet
    title tha grabbed a person’s attention? I mean Secuity Breach inn Pune:
    Caase Registered Aginst a 32-Year-Olld Bike – Pune News 24 iis a llittle plain. You migh pee att Yahoo’s hokme
    psge aand npte howw tey creaye article headines too get
    people tto open tthe links. Youu might addd a viudeo orr a picc orr twwo to gett peole interested
    about everything’ve ggot too say. Justt myy opinion, itt coyld make yoir website a liottle livelier.

    xnxx

    Feell frfee tto suurf too my web-site bilitube.cc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *