९ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्र सिंह राशीत गोचर करत आहे. या ग्रहस्थितीचा आणि गोचरचा लाभ अनेक भाग्यवान राशींना मिळताना दिसणार आहे. आज नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग असून थांबलेली कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल आणि आरोग्यात सुधारणा होईल. पाहुयात मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल:
-
मेष राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने नसेल, तरीही न्यायालय किंवा कायदेशीर बाबींशी संबंधित वादांमध्ये काहीसा दिलासा मिळू शकतो. आपली बुद्धिमत्ता, अंतर्दृष्टी आणि चातुर्य वापरून तुम्ही अनेक गुंतागुंतीची कामे सहजपणे पूर्ण कराल. ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून नवीन कामाची सुरुवात करण्याची योजना आखू शकता. कुटुंब आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
-
उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करा.
-
-
वृषभ राशी: नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमची गोड बोलण्याची पद्धत आणि सकारात्मक वृत्ती लोकांना प्रभावित करेल. व्यवसायात नफ्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि सामाजिक स्तरावर मान-सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते, तसेच पदोन्नती किंवा नवीन मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
-
उपाय: गायींना हिरवा चारा द्या.
-
-
मिथुन राशी: आज तुम्ही आपल्या व्यस्त दिनक्रमातून कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी एखाद्या मित्र किंवा जिवलग व्यक्तीचे सहकार्य लाभेल. मात्र, मालमत्ता खरेदी-विक्रीची योजना आखताना घाई करू नका आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्साहवर्धक असून परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
-
उपाय: आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या.
-
-
कर्क राशी: आज आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हवामान किंवा सततच्या थकव्यामुळे शरीरात अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते, ज्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याच्या मदतीमुळे फायदा होईल. नोकरीत तुमची कामगिरी उत्तम राहील आणि मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. विरोधक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे अनावश्यक वादांपासून दूर राहा.
-
उपाय: गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या.
-
-
सिंह राशी: आर्थिक आणि पैशांच्या बाबींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल. रखडलेले पैसे परत मिळू शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची चिन्हे आहेत. जुन्या मित्राशी अचानक संवाद झाल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होऊन मन आनंदित होईल. तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण कराल. मात्र, अतिराग किंवा घाईगडबड टाळा, संयम बाळगणे फायद्याचे ठरेल.
-
उपाय: भगवान गणेशाला लाडू अर्पण करा.
-
-
कन्या राशी: आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि उत्साहपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी तुमची कला व प्रतिभा दाखवण्याच्या नवीन संधी मिळतील. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्त्रोत किंवा फायदेशीर प्रस्ताव समोर येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात नवीन लोकांशी संपर्क वाढल्यास भविष्यात फायदा होईल. कुटुंबातील सकारात्मक वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करणे टाळावे.
-
उपाय: शिव चालीसाचा पाठ करा.
-
-
तूळ राशी: आज कुटुंबात प्रेम, परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणाचे वातावरण असेल. एखादा महत्त्वाचा प्रकल्प किंवा संशोधनात्मक कामात तुमची रुची वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखणे गरजेचे आहे. प्रिय व्यक्तीसमोर आपली बाजू मांडताना काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम बाळg. आर्थिक ताणतणाव हळूहळू कमी होईल.
-
उपाय: माता सरस्वतीची पूजा करा.
-
-
वृश्चिक राशी: आज इतरांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकाऱ्यांसोबत संबंध दृढ होतील आणि प्रभावशाली लोकांशी ओळख होईल. कोणाला पूर्वी दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत भविष्यासाठी नवीन योजना आखू शकता. दानधर्म किंवा धार्मिक कार्यात रुची वाढेल.
-
उपाय: गरजूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.
-
-
धनु राशी: आज तुम्हाला एखादी उत्तम आणि आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या सन्माननीय किंवा अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. धनार्जनाचे नवीन मार्ग दिसतील आणि आर्थिक बाजू मजबूत होईल. मात्र, छोट्या प्रलोभनांमध्ये किंवा आकर्षक प्रस्तावांमध्ये येऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. मालमत्ता किंवा स्वतःच्या कामगिरीबद्दल मनात अभिमानाची भावना राहील.
-
उपाय: शिवलिंगावर दूध अर्पण करा.
-
-
मकर राशी: आज कामाच्या ठिकाणी अनावश्यक राजकारण आणि वादांपासून स्वतःला दूर ठेवा. काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा तुमच्यात असेल, ज्याचा योग्य दिशेने वापर केल्यास मोठे यश मिळू शकते. खाण्यापिण्याच्या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. पैसे, कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या; कोणावरही अंधपणे विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्याना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.
-
उपाय: मुंग्यांना साखर खाऊ घाला.
-
-
कुंभ राशी: आज कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमचा पैसा योग्य व उपयुक्त ठिकाणी खर्च होईल. आर्थिक स्थिती संतुलित राहील. परीक्षेविषयी मनात थोडी भीती किंवा तणाव असला तरी विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्ही त्यांचे सर्व मनसुबे उधळून लावाल. कायदेशीर बाबींमध्ये व्यावसायिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.
-
उपाय: हनुमानजींना फुले अर्पण करा.
-
-
मीन राशी: आज छोट्या-छोट्या गोष्टींवर रागवणे टाळा, कारण तुमचा संताप जवळच्या नात्यांमध्ये दुरावा किंवा ताण निर्माण करू शकतो. ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी नवीन योजना आखून व्यवसाय वाढवण्याची ही उत्तम वेळ आहे. मुलांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या महत्त्वाच्या योजना सर्वांसोबत शेअर करणे टाळा.
-
उपाय: गणपती बाप्पाला मोदक अर्पण करा.
-
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!

























Subscribe to my channel



