
Pune : जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुण्यातील हिंजवडीत आणखी ४५३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने या महिन्यात हिंजवडी गावात १६.४ एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यातही या ठिकाणी जमीन खरेदी केली होती. यामुळे कंपनीने महिनाभरात हिंजवडीत एकूण सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडियाने हिंजवडी गावाच्या हद्दीत ही जमीन खरेदी केली आहे. हिंजवडीहे राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा भाग आहे. मायक्रोसॉफ्टने ही जमीन व्हिवा हायवेज कंपनीकडून खरेदी केली आहे. हा व्यवहार ४५३ कोटी रुपयांना झाला आहे. या व्यवहारापोटी मायक्रोसॉफ्टने २७.१८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाने ऑगस्ट महिन्यात हिंजवडीत १६.४ एकर जमीन खरेदी केली होती. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टने ५२० कोटी रुपयांना हा व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी मायक्रोसॉफ्टने ३१.१८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक प्रवीण देशपांडे यांनी दिली.
|
Pimpri : भोसरीतील कृत्रिम धावमार्ग पुन्हा बंद; आता किती दिवस राहणार बंद? |
मायक्रोसॉफ्टने दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये २५ एकर जमीन खरेदी करून तिथे डेटा सेंटरची उभारणी सुरू केली आहे. त्यानंतर कंपनीने आता आणखी जमीन खरेदी केली आहे. आता खरेदी केलेल्या जमिनीचा वापर नेमका कशासाठी करणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
मायक्रोसॉफ्टची देशात हैदराबाद, बंगळुरू आणि नोएडा येथे डेटा सेंटर सध्या कार्यरत असून, तिथे एकूण २३ हजार कर्मचारी काम करीत आहेत. याचबरोबर कंपनीने याच वर्षी हैदराबादमध्ये ४८ एकर जमीन २६७ कोटी रुपयांना डेटा सेंटर उभारणीसाठी खरेदी केली. त्यानंतर आता हिंजवडीत कंपनीने दोन वेळा जमीन खरेदी केली आहे.
पायाभूत सुविधा सुधारण्याचे आव्हान
हिंजवडी आयटी पार्कमध्ये माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यात इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंटसह इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा समोर येत आहे. आता तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने गुंतवणूक केल्याने आयटी पार्कला गुंतवणुकीसाठी अजूनही पसंती असल्याचे समोर आले आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारून जागतिक पातळीवरील कंपन्यांना त्या दर्जाची सेवा देण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांवर आली आहे.
हिंजवडी आयटी पार्क
आयटी कंपन्या – २००
मनुष्यबळ – ३ लाख
मायक्रोसॉफ्टची हिंजवडीतील गुंतवणूक
सन २०२२ – २५ एकर जमिनीची ३२९ कोटी रुपयांना खरेदी
ऑगस्ट २०२४ – १६.४ एकर जमिनीची ५२० कोटी रुपयांना खरेदी
सप्टेंबर २०२४ – १६.४ एकर जमिनीची ४५३ कोटी रुपयांना खरेदी
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही






























Subscribe to my channel




