
Uruli Kanchan: : निवडणुकीच्या बदलत्या समीकरणाची बीजे इतकी खोलवर रुजली आहेत की, यातून नेमकी लोकशाही जिवंत राहणार का आर्थिक हुकुमशाही येणार असा सवाल या प्रक्रियेतून दूर असणाऱ्या वर्गाला सध्या सतावत आहे. यात्रा, देवदर्शन, लक्ष्मीदर्शन की गावातील, परिसरातील विकास कामे याचीच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा गाजत आहेत. कोण जिंकणार कोण हरणार हा विषयच मतदारांच्या गावीच नाही.’
हवेली तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापले असून हवेली तालुक्यातील समीकरणे, उमेदवारांचा धडक प्रचार आणि देवदर्शन-यात्रांच्या माध्यमातून रंगत वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत गावागावातील एक मोठा बदल प्रकर्षाने जाणवतो गावपुढाऱ्यांची पारंपरिक पकड सैल झाली असून, थेट उमेदवाराचा मतदारांशी संपर्क ही बाब निर्णायक ठरत आहे. पूर्वी गावातील वडीलधारी मंडळींनी आदेश द्यायचा त्याप्रमाणे मतदान व्हायचे... नंतर गांवपुढाऱ्यांच्या निर्णयावर निवडणूक काही काळ चालली... अन आता आयोध्या... काशी...
उज्जैन... कोल्हापूर... ज्योतिबा... पंढरपूर. तुळजापूर... अक्कलकोट... गाणगापूर आदी ठिकाणचे देवदर्शन वा पर्यटन, त्यानंतर लक्ष्मीदर्शन तरच मतदर्शन असा नवीन फंडा चालू झाल्याने, लोकशाहीत वावरणाऱ्या सर्वसामान्यांची ही निवडणूक राहिली नाही असे वास्तव चित्र सध्या बघायला मिळत आहे नव्हे तर गंभीर चर्चेचा विषय झाला आहे.
|
|
उमेदवारांचे थेट घराघरात दौरे सुरू झालेले आहेत, सोशल मीडियावरून थेट संवाद वाढलेला दिसत आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन, कोपरा बैठक, जाहिरनामा, मुद्द्यावर आधारित प्रचार यामुळे मध्यस्थी करणाऱ्या गावपुढाऱ्यांची भूमिका पूर्णपणे मागे पडली आहे. त्यातच येणाऱ्या काळातील ग्रामपंचायतीचे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पुढाऱ्यांनीही सावध भूमिका घेतलेली दिसत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर मतदारांचा विचार बदलतोय फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स, युट्यूब शॉर्ट्स, व्हॉट्सअॅप ग्रुप यांद्वारे उमेदवारांकडून त्यांच्या कामांचा आढावा, प्रतिमा आणि घोषणापत्र थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे.
यामुळे माहितीचे केंद्रीकरण संपुष्टात आले असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष कामावर आधारित चर्चांना उधाण आले आहे. राजकारणातील आर्थिक प्रभाव चिंताजनक आहे. "पैसे घेणे चुकीचे आहे अशी लोकांची पूर्वीची धारणा "आताची मानसिकता "वरचे नेते कमावतात, आम्ही घेतलं तर चूक काय? अशी आहे. भेटवस्तू, देवदर्शन व्हिडिओ, जेवण पार्त्या आणि शेवटी पैशांचे व्यवहार या नव्या 'फंड्या'मुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सामाजिक, राजकीय निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे कठीण झाले आहे.
या बाबी मुळे हवेलीत नवीन समीकरण तयार झाले आहे "देवदर्शन, लक्ष्मीदर्शन की विकास ? "यात्रां, मंदिर भेटी, व्हिडिओ प्रचार या सर्वांमुळे गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे की, "निवडणुका विकासावर होतील की देवदर्शनावर?" त्यामध्ये काही सामाजिक सदस्यांचे मत असे आहे की, "जर निवडणुका मंदिर भेटी आणि व्हिडिओंवर चालणार असतील, तर पैसे नसलेले उमेदवार कसे निवडणूक लढवणार?"
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




