
Malegaon : माळेगाव बुद्रूक (बारामती) नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले. (ता.२) रोजी मतदानाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला सोरटे यांनी दिली. माळेगाव नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्षपदासह १८ जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी शहरात एकूण २२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या निवडणूकीत १८ हजार ७३० मतदार संख्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
त्यामध्ये ९ हजार ३८६ महिला मतदार समावेश आहे. त्यानुसार निवडणूक केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः १२७ दिव्यांग मतदारांना आवश्यकत्या सुविधा उभारल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर व स्वयंसेवकांची सोय केली असून पिण्याचे पाणी, शौचालये आणि सावली यांचीही काटेकोर व्यवस्था आहे. मतदारांच्या सोयीसाठी प्रतीक्षा रांगेत मार्किंग आणि शिस्त राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात आहेत. मतदानासाठी लागणाऱ्या EVM यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्या यंत्रांची मॉक पोल प्रक्रिया यशस्वी झाली असून मतदान कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व पात्र मतदारांनी आवश्यक ओळखपत्र व कागदपत्रे घेऊन घरातून बाहेर पडावे. शांततेत आणि नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सोरटे यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी लोंढे उपस्थित होते.
|
|
कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
माळेगावात मतदान सुरळीत व शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दंगानियंत्रण पथकही सज्ज आहे. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गस्ती पथके दिवसभर सतत गस्त घालत राहणार आहेत. ड्रोनच्या सहाय्याने देखील नजर ठेवली जाणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची ओळख पटली आहे, तिथे अतिरिक्त पोलिस सुरक्षा तैनात केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन लोखंडे यांनी दिली.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




