
Pune : लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठीच्या (२०२४-२५) रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. आहे तेच दर ठेवण्याचा निर्णय घेतला सरकारने आहे. त्यामुळे पुढील वर्षीही रेडीरेकनरचे दर स्थिर राहणार आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी १ एप्रिलला रेडीरेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार नोंदणी विभागाने जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांतील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची आकडेवारी घेऊन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकरनचे दर निश्चित करताना त्यात सरासरी सात टक्के वाढ प्रस्तावित केली होती. तसा प्रस्तावही राज्य सरकारने मान्यतेसाठी पाठविला होता.
|
|
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू झाली आहे. चार जूनलाही आचारसंहिता संपणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. संपूर्ण वर्ष निवडणुकीच्या धामधुमीत जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकार रेडीरेकनरमधील दराबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल होते. दरम्यान, आज रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याबाबतचा आदेश महसूल व वन विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी दिला आहे. त्यामुळे मागील वर्षीचे दर पुढील आर्थिक वर्षातही कायम राहणार आहेत.
यापूर्वी रेडीरेकनरमधील दर निश्चितीसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून जानेवारी ते डिसेंबर हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जात होते. त्यामुळे एक जानेवारीला रेडीरेकनरमध्ये नव्याने निश्चित केलेले दर लागू होत होते. परंतु चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने कायद्यात बदल करीत रेडीरेकनरमधील दर निश्चितीच्या कालवधीत बदल केला. आता एक एप्रिलपासून राज्यात दर नव्याने लागू केले जातात. तसेच यापूर्वी दर निश्चित करून ते लागू करण्याचे अधिकार विभागाला होते. तेसुद्धा राज्य सरकारने स्वत:कडे घेतले. दर निश्चितीच्या कालवधीत बदल केल्यामुळे यंदा प्रथम दरबदलाचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
घर खरेदीदार व बांधकाम व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच बांधकाम क्षेत्रात वाढलेल्या उलाढाली कायम ठेवण्यासाठी रेडीरेकनर दरात बदल करू नये, अशी मागणी आम्ही ‘क्रेडाई’च्या माध्यमातून केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून दर कायम ठेवल्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करतो. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील दर मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी आहेत. ते वाढले असते तर घरांच्या किमती वाढल्या असत्या. मात्र, दर कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




