कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याहीआश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधीलोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यातफारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीयअभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्यानेपाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे'' असेआवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातीलयुवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीसएका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावालागेल, असे कुणाला वाटले होते का? काहीकाळापूर्वीपर्यंत दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) देशात फारशी परिचित नव्हती. आजपरिस्थिती अशी आहे की, टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी, युट्यूबर्स आणि मोठे राजकारणी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील साध्या घराचा शोध घेत आहेत. अनेकांनी केवळ ऑनलाइन ट्रेंड म्हणून दुर्लक्ष केलेली ही चळवळ अचानक वर्षातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींपैकी एक ठरली आहे. मात्र, सीजेपीने तात्कालिक लढाई जिंकली असली तरी तिची खरी कसोटी आता सुरू होते. सीजेपीने केवळप्रेशर ग्रुप म्हणूनच राहावे की निवडणुकीच्याराजकारणातही उतरावे? अलीकडेच मी हाच प्रश्नदिपके यांना विचारला. त्यांनी तत्काळ उत्तर दिले,"राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आम्ही विचारहीकेलेला नाही. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणीकरणारी चळवळ म्हणूनच आम्हाला राहायचे आहे.’देशाने यापूर्वीही असेच विधान ऐकले होते . 2011 मध्येअरविंद केजरीवाल वारंवार सांगत होते की,राजकारणात येण्याचा विचार नाही. मात्र, अवघ्या दोनवर्षांत ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. प्रत्येक यशस्वीआंदोलनासमोर शेवटी हाच प्रश्न उभा राहतो—नैतिकबळाचे राजकीय शक्तीत रूपांतर कसे करायचे? तेही तीनैतिक विश्वासार्हता गमावल्याशिवाय? ही कोंडी दिपकेअनेकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात.कारण त्यांनी आम आदमी पक्षासोबत काम केले आहे.त्यामुळे त्यांनी या प्रवासाच्या दोन्ही बाजू जवळूनपाहिल्या आहेत. आघाड्या, तडजोडी आणिसंघटनात्मक बंधने अपरिहार्य असतात. तेव्हा तिचीनैतिक शुचिता टिकवून ठेवणे किती कठीण असते.इतिहास सांगतो की, प्रत्येक यशस्वी राजकीयपरिवर्तनासाठी केवळ जनआक्रोश पुरेसा नसतो.त्यासाठी योग्य वेळ व स्पष्ट सामाजिक आधारआवश्यक असतो. केजरीवाल केवळ भ्रष्टाचारविरोधीलाटेवर स्वार झाले नव्हते. ते भारतातील वाढत्या शहरीमध्यमवर्गाचा आवाज बनले होते. भ्रष्टाचार, निकृष्टसार्वजनिक सेवा आणि सामान्यांच्या प्रश्नांपासूनदुरावलेल्या व्यवस्थेमुळे हा सुशिक्षित वर्ग अस्वस्थझाला होता. हाच वर्ग ‘आप''चा भक्कम सामाजिक पायाठरला. नैतिक संतापामुळे एखाद्या आंदोलनाचा जन्महोऊ शकतो. पण निवडणुकीत तो फार काळ टिकतनाही. त्यामुळेच दिपके यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्नउभा राहतो. सीजेपीचा मुख्य समर्थक वर्ग नेमकाकोणता? वारंवार पेपरफुटीमुळे त्रस्त झालेली जेन-झी?नोकरीसाठी संघर्ष करणारे बेरोजगार पदवीधर? कीभारताच्या विकासप्रवासात आपण मागे पडलो आहोत,असे वाटणारा महत्त्वाकांक्षी निम्न मध्यमवर्ग? याप्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाल्याशिवाय कोणत्याहीआंदोलनाचे निवडणुकीतील राजकीय ताकदीत रूपांतरहोणे अत्यंत कठीण आहे. भारतीय जनता पक्ष आजहीदेशातील सर्वात प्रभावी निवडणूक शक्ती आहे. एकाकेंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणे ही निश्चितच मोठीकामगिरी आहे. परंतु भाजपासारख्या मजबूत निवडणूकयंत्रणेला पराभूत करणे ही पूर्ण वेगळी बाब आहे. खरे तरसीजेपीची सर्वात मोठी ताकद याच गोष्टीत आहे की, तीराजकीय पक्ष नाही. या आंदोलनाने जनतेच्या मनातस्थान निर्माण केले. कारण ते पारंपरिक पक्षीयराजकारणाच्या पलीकडे उभे राहिले. त्यांनी युवकांनाआपला रोष व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्धकरून दिले. ही नैतिक विश्वासार्हता मौल्यवान आहे.एकदा ती गमावली तर ती पुन्हा मिळवणे अत्यंत कठीणठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एखादी चळवळ निवडणुकीच्याराजकारणात प्रवेश करते तसा तिचाप्रत्येक निर्णय तडजोडीसारखा वाटूलागतो. एकेकाळी व्यवस्थेला बाहेरूनआव्हान देणारी संघटना हळूहळू त्याचव्यवस्थेचा भाग बनते. कदाचित याचकारणामुळे सीजेपीला दबाव गट म्हणूनचकायम राहायचे असावे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




